आळंदी प्रतिनिधी आरिफभाई शेख
आळंदी मध्ये लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात आळंदी नगर परिषदेने ठेके पद्धतीने वाहनतळ वसुलीचा ठेका दिलेला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असल्याची बातमी वारंवार प्रसिद्ध होत आहेत त्याच अनुषंगाने फुलगाव येथील सुनील वागस्कर या भाविकाने पार्किंगच्या माध्यमातून लूट करत असल्याची तक्रार मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्याकडे केली आहे.
सदर बाबत घडलेली घटना अशी की सुनील वागस्कर हे एकादशीनिमित्त दर्शनासाठी तीर्थक्षेत्र आळंदी येथील नदी काठी असलेल्या आळंदी नगरपरिषद पार्किंग येथे गाडी पार्क करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांची गाडी पार्किंगचे शुल्क 100 रुपयाची मागणी कर्मचाऱ्याकडून करण्यात आली. त्यावेळी त्यांनी मागील वेळेस मी पन्नास हजार रुपये भरले होते शंभर रुपये कशाचे म्हणून विचारणा केली असता कर्मचाऱ्यांनी उद्धट वर्तन करत आरेरावी ची भाषा वापरली. याबाबत आम्हाला सदर ठेका महागात पडलेला आहे आणि त्यामुळे शनिवार आणि रविवार या दिवशी शंभर रुपये आकारणी गर्दी असल्याने आम्ही घेतो.
शंभर रुपये द्या अन्यथा गाडी लावा नाहीतर लावू नका अशा भाषेमध्ये कर्मचाऱ्यांनी उत्तर दिले याबाबत आळंदी नगर परिषदेमध्ये या पावत्यांची नोंदही असते.परंतु परिषदे कडून लक्ष दिले जात नाही अशी तक्रार आलेली आहे. मागील आठवड्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने शुल्क आकारणी वरून पार्किंग वरील ठेकेदार कर्मचाऱ्यांची दांडक्याने धुलाई केल्याची चर्चा आहे. याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार गेल्यानंतर मिटवते घेत सदर प्रकरण मिटवण्यात आले होते. मुळात ठेकेची लिलाव रक्कम ही ६५ लाख रुपये वार्षिक होती नंतरच्या काळामध्ये राहिलेले तीस लाख रुपये संबंधित ठेकेदाराने भरलेच नाही याबाबत वृत्तपत्रांमध्ये बातमी प्रसिद्ध झाली त्यानंतर प्रशासनाने ती कर वसुली केली आणि नंतर मात्र 45 लाख रुपयांचा ठेका करण्यात आला मुळात ठेक्याची रक्कम 65 लाख होती तर ती वाढीव रक्कम भरली जावी अशा हिशोबाने शासकीय नियम आहेत. ठेक्याची रक्कम कमी करून कशासाठी घेतली गेली याबाबत बोध होत नाही. प्रसिद्धी माध्यमातून याबाबत सविस्तर बातमी प्रसिद्धीस आल्याने या विषयाला वाचा फुटली आहे.