बारामती प्रतिनिधी युवराज इंदलकर
बारामती पुणे, पुणे बारामती डेमु पॅसेंजर गाडी रोज सकाळ संध्याकाळ१ते२ तास लेट होत असल्याने याचा प्रवासी, विद्यार्थी, नोकरदारांना खुप हाल सहन करावे लागत आहे.
दौंड मधुन ७:०५am निघांनारी दौंड - पुणे शटल नंतर दुसरी पुण्याला जाणारी गाडी म्हणजे बारामती पुणे डेमो पॅसेंजर जी बारामती मधुन ७:१५am सकाळी सुटते
- ट्रेन क्र.०१५२६बारामती पुणे डेमो सकाळी बारामती मधुन ७:१५am ला सुटणारी गाडी बारामती मधुन थेट सोडत नसल्या मुळे हा गोंधळ चालला आहे.
- बारामती पुणे डेमो (७:१५am) ही गाडी दररोज सकाळी दौंड येथून सकाळी ५:४५am (०१५२३) ला बारामती च्या दिशेने सोडली जाते ती गाडी बारामती मध्ये ७:००am सकाळी दाखल होते. पण बरेच वेळा ही गाडी बारामती मध्ये सकाळी लेट येते ज्या मुळे ट्रेन क्र.०१५२६(७.१५am )बारामती पुणे डेमो पॅसेंजर) गाडी लेट सुटते.
- दौंड मधुन सकाळ संध्याकाळ माल गाडी सोडली जाते ज्यामुळे बारामती पुणे डेमो पॅसेंजर लेट होते.
- दौंड ते बारामती हा सेक्शन जवळ जवळ ४४ किमी चा आहे पण मध्य रेल्वे मुख्यालय कडून अद्याप अजुन ही रेल्वे लाईन चे दुहेरी करण झालेले नाही.
- दुहेरी लाईन नसल्या कारणी माल गाडी बारामती मध्ये पोचू पर्यंत पॅसेंजर गाडी दौंड मध्येच थांबवली जाते. रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर बारामती ते दौंड दुहेरिकरण हाती घेऊन कामाला लागाले पाहिजे.
- दौंड ते बारामती मधले सर्व स्टेशन मळद, शिरसाई, कटफळ स्टेशन वर प्लॅटफॉर्म बनवावे रात्रीच्या वेळी गाडी कुठेही थांबते ज्यामुळे वयस्कर लोकांना, महिलांना ह्याचा खुप त्रास सहन करावा लागतोय. सर्व स्टेशन वर प्लॅटफॉर्म बनवून उंची वाढवून तिकीट काऊंटर उघडावे.
- बारामती ते दौंड दरम्यान कोणतीही सिग्नल यंत्रणा नसल्या कारणी गाडी ची हालचाल बघता येत नाही तरी रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर ही वरील कामे हाती घेऊन कामाला लागावे.
रेल्वे प्रशासन जवळ वेळोवेळी मीटिंग घेऊन, निवेदन देऊन सुद्धा हे गाडी लेट होणे, माल गाडी पुढे सोडणे वारंवार होत आहे तरी प्रशासनाने ह्याची खबर घ्यवी व लवकरातलवकर तोडगा काढावा.गाडी रोज उशिरा धावत असल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे खूप हाल होत आहेत. रेल्वे प्रशासनाला वारंवार तक्रार करूनही कोणत्याही तक्रारीची निवारण केले जात नाही. रेल्वे संदर्भात तक्रार केली तर रेल्वे रोज मुद्दाम लेट सोडली जाते. बारामतीला रोज संध्याकाळी गाडी लेट जात असल्यामुळे महिलांना खूप संकटांना सामोरे जावे लागत आहे. गाडी मुद्दाम लेट सोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी प्रवाशांकडून मागणी होत आहे. जेणेकरून इथून पुढे असे प्रकार रेल्वे विभागाकडून होणार नाहीत. - हर्षल शिंदे (बारामती-पुणे रेल्वे प्रवासी ग्रूप) यांनी सांगितले.