बारामती प्रतिनिधी युवराज इंदलकर
पाटस ते उंडवडी (ता बारामती) कप मार्गे एमआयडीसी वरुन पंढरपुरला जाणारा संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम पुर्णत्वाकडे असुन या महामार्गावर जागोजागी उड्डाण पूल तसेच येण्या जाण्यासाठी मोरी बनवण्यात आल्या आहेत.उंडवडी कप येथेही गावत जाण्यासाठी मोरी बनवण्यात आली असुन मोरी खालून जाणा-या रस्त्यावरील काम संत गतीने चालु आहे.शनिवार दि.२ सप्टेंबर रोजी पहाटे या परिसरात पाऊसाने हजेरी लावली ऐकाच पाऊसात या मोरीत पाणी साचल्याने नागरीकांना तसेच शाळेतील मुलांना पाण्यातुन वाट काढावी लागली.
तसेच रस्ताही खोदल्याने निसरडा झाला असुन वाहणे घसरून अपघात होण्याची दाट शक्यता आहे.या मोरीखालुन जराड वाडी, गाडिखेल,बनवाडी, उंडवडी कप, कोकरे वस्ती सह आजुबाजुच्या परिसरातील नागरीक तसेच विद्यार्थी यांची कायम वर्दळ असते. ऐकाच पाऊसात जर मोरीत पाणी साचत असेल तर मोठा पाऊस झाला तर विद्यार्थींनी शाळूत जायचे कसे असा सवाल पालक करत असुन लवकरात लवकर मोरी खालील रस्ता दुरुस्ती करुन पाणी जाण्यासाठी सोय करावी अशी मागणी गावकरी व पालकांनी केली आहे.