सुनील भंडारे पाटील
लोणीकंद (ता हवेली) येथे चाललेल्या टोरेंट गॅस कंपनीच्या कामामुळे पुणे नगर महामार्ग लगत करण्यात आलेल्या उत्खननामुळे रस्त्यालगत खड्डे, तसेच रस्त्यावर विखुरलेल्या मातीमुळे कोट्यावधी रुपये खर्चून तयार केलेल्या रस्त्याचे नुकसान झाले असून यावर पुणे सार्वजनिक बांधकाम विभाग आता दंडात्मक कारवाई करणार का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतून विचारला जात आहे,
गेल्या काही दिवसांपासून पुणे नगर महामार्ग लगत टोरेंट गॅस पाईपलाईनचे काम चालू असून सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पुणे जिल्हाधिकारी यांच्या परवानगी मध्ये महामार्गापासून पंधरा मीटर अंतरावर खोदकाम करण्याची तरतूद असताना संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याच्या बगलेला मोठे खड्डे केले जात आहेत, तसेच उकरलेली माती रस्त्यावर टाकली जात असल्याने कोट्यावधी रुपये खर्च करून आत्ताच नवीन तयार केलेला पुणे नगर महामार्ग या रस्त्याचे नुकसान होत आहे, याबाबत पीडब्ल्यूडी लवकरच दंडात्मक कारवाई करणार का? अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये चालू आहे,
कोरेगाव भीमा येथील भीमा नदीलगत चाललेले ड्रिंल मशीन कायमस्वरूपी बंद होणार असून ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पूल, जयस्तंभ संरक्षणाच्या निर्णयानुसार संबंधित गॅस पाईपलाईन इतरत्र वळवण्यात येणार असल्याच्या हालचाली चालू झाली असून लवकरच यावर निर्णय होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे,