निपाणी प्रतिनिधी सागर श्रीखंडे
यमगरणी येथे आज दुर्गामाता दौंडी चा आजचा तिसरा दिवस. वज्रकांत सदलगे तसेच निपाणीचे नंदेश सदलगे यांच्या हस्ते सर्वप्रथम भगव्या ध्वजाचे व शस्त्राचे पूजन करण्यात आले. प्रेरणा मंत्र घेऊन दुर्गामाता दौडीची सुरुवात करण्यात आली,
यावेळी नंदेश सदलगे यांनी मार्गदर्शन करते वेळी म्हटले की शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी जी श्रीदुर्गा माता दौड चालू केली होती आज ती शहर, गाव, खेडे, वस्ती, वाढीवर दुर्गामाता दौड निघत आहे. निपाणी परिसरातही श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प्राणलिंग महास्वामी यांच्या मार्गदर्शना खाली निपाणी ग्रामीण भागात ही मोठ्या प्रमाणात श्रीदुर्गा माता दौड सुरू झाले आहे.
श्री दुर्गामाता दौड. ही देश जागवण्याचे कार्य आहे ! राष्ट्रभक्त मने घडवण्याचा मार्ग आहे ! तरुणांमध्ये देशभिमान भिनवण्याचा मार्ग आहे ! शिवछत्रपती धर्मवीरशंभु महाराज यांच्या राष्ट्रीय कार्याची जाणीव करुण देणारा मार्ग आहे ! तरुणांना भारतीय संस्कृतीची जाणीव करुन देणारा मार्ग म्हणजेच श्री दुर्गा माता दौड आहे असे मत नंदेश सदलगे यांनी यावेळी व्यक्त केली ही दुर्गा माता दौंड यमगर्णी येथील गावभाग, माळभाग, बिडी कॉलनी, राजे ग्रुप येथे सांगता करण्यात आली,
यावेळी दुर्गा माता दौंडीचे स्वागत श्रीगणेश तरुण मंडळ माळभग वरियर्स, स्वयंभू तरुण मंडळ बिडी कॉलनी, श्रीगणेश उत्सव तरुण मंडळ बिडी कॉलनी या मंडळांनी पुष्प उष्टी,रांगोळ्या काढून मंडळ्याच्या वतीने स्वागत केली. तसेच गावातील माता भगिनी यांनी रांगोळी व पाणी घालून दुर्गा माता दौंडचे स्वागत केले. या दौंडी मध्ये राष्ट्र भक्त गीते व देवी देवता आणी राष्ट्रपुरुष यांचा जयघोष करून वातावरण भगवे मय करण्यात आले. या दौंडी ची सांगता राजे ग्रुप नवरात्र उत्सव मंडळ येथे दुर्गा मातेची आरती करून सांगता करण्यात आली. यावेळी गावातील मोठ्या संखेने तरुण व तरुणी उपस्थित होते.