कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथील ऐतिहासिक, ब्रिटिश कालीन ठेवा असणारा रेखीव,आकर्षक, दगडी बांधकामा मधील पूल, तसेच विजयस्तंभला काही धोका झाल्यास जबाबदारीचे हमीपत्र टोरेंट गॅस कंपनीच्या वतीने ग्रामपंचायत कोरेगाव भीमा यांना देण्यात आले आहे, या हमीपत्र नंतर संबंधित कंपनीने खोदकाम चालू केले आहे, मग हमीपत्र घेऊन काम चालू करू देणारी ग्रामपंचायत कोण? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे,
गेल्या काही दिवसांपासून टोरेंट गॅस कंपनीच्या वतीने पुणे शहराकडून अहिल्यानगर कडे पुणे नगर महामार्गलगत नियमांची पायमल्ली करत राजरोसपणे खोदकाम करून पाईपलाईन टाकण्याचे काम चालू आहे, सार्वजनिक बांधकाम(PWD) च्या परवानगी मध्ये लहान मोठा पूल या जवळून पाईपलाईन टाकू नये असा स्पष्ट उल्लेख असताना,
ग्रामपंचायत ने ऐतिहासिक ब्रिटिश कालीन तसेच संपूर्ण देशाची अस्मिता असणाऱ्या या वास्तूंना पाईपलाईन पासून धोका नसल्याचे हमीपत्र घेऊन कोरेगाव भीमा ग्रामपंचायतिने ग्रामस्थांनीबंद केलेले काम चालू करून दिले, मुळात हे काम अखत्यारीत असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पुणे जिल्हाधिकारी यांच्या परवानगीत लहान मोठे पूल यांच्याजवळ पाईप लाईन टाकण्यास परवानगी नसताना ग्रामपंचायतीने हमीपत्र घेऊन परवानगी कशी दिली? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे,