कोरेगाव भीमा ग्रामस्थांनी टॉरेंत कंपनीचे काम केले बंद ऐतिहासिक वास्तूंना धोका नसल्याचे हमीपत्र मागणी

Bharari News
0
कोरेगाव भिमाच्या ऐतिहासिक पुलास गॕस लाईन मुळे धोका असल्याचा 
ग्रामस्थांचा संशय
कोरेगाव भिमा येथील गॅस कंपनीचे खोदकामास स्थगिती देत लेखी हमी देऊन काम सुरू करण्याची मागणी.
पुलाला धोका नसल्याचे बांधकाम विभागाचे, संबधित इतर विभाग व गॅस एजेंन्सी यांनी लेखी हमीपत्र द्यावे व ग्रामस्थांची परवानगी घेऊनच काम सुरू करावे
 सुनील भंडारे पाटील 
            कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथील ऐतिहासिक पुलाखाली महेश गॅस एजेन्सीचे खोदकाम  काम सुरू असून या खोदकामामुळे कोरेगाव भिमा येथील ऐतिहासिक जुना पुल सरसेनापती हंबीरराव मोहिते या पुलाला मोठा धोका होऊ शकतो म्हणून बांधकाम विभाग व संबधित विभागाचे हमीपत्र मिळाल्याशिवाय काम सुरू करण्यात येऊ नये,तसेच कोरेगाव भिमा ग्रामस्थांची या कामासाठी परवानगी घेण्यात यावी अशी मागणी करत सरपंच विक्रम गव्हाणे ,ग्रामसेवक रतन दवणे यांच्या उपस्थितीत काम थांबवण्यात आले.
         कोरेगाव भिमा येथील ऐतिहासिक वैभव असणारा दगडी चिरेबंदी बांधकाम असलेला जुना पुल हा कोरेगाव भिमाच्या वैभवात भर घालत असून या पुलाचा विदर्भाला जोडणारा महत्वाचा पुल असे पाहिले जात असून टोरांटो गॅस कंपनी , महेश गॅस एजेंन्सी यांचे खोदकाम सुरू असून यामुळे पुलाला धोका निर्माण होऊ शकतो भविष्यात या पुलाला काहीही होणार नाही व एक ऐतिहासिक वास्तूला धोका निर्माण होणार नाही असे लेखी हमी पत्र बांधकाम विभागाने व सक्षम अधिकाऱ्याने , संबधित सर्व विभागांनी व सदर गॅस कंपनीने द्यावे व त्यानंतर जर पुलाला काही धोका निर्माण झाल्यास त्याला आम्ही जबाबदार राहू असे लेखी हमी पत्र देण्याची मागणी करण्यात आली.
ग्राम पंचायतीची परवानगी बाबत संशय - 
यावेळी संबधित गॅस एजेंन्सिला कोरेगाव भिमा ग्रामपंचायतीच्या वतीने परवानगी बाबत संशय निर्माण होत असून ग्रामपंचायत सदस्य संदीप ढेरंगे यांनी याबाबत सरपंच विक्रम गव्हाणे व ग्रामसेवक रतन दवणे यांना विचारले असता त्यांनी मासिक सभेत विषय घेतल्याचे सांगितले पण सदस्य संदीप ढेरंगे यांनी सांगितले की असा कोणताही विषय झाला नाही ? यावर सरपंच विक्रम गव्हाणे यांना आम्हाला लेखी दाखवा असे सांगण्यात आले.
      याबाबत कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर रुपेश कुमार सिंग यांना माजी सरपंच विजय गव्हाणे व ग्रामपंचायत सदस्य संदीप ढेरंगे यांनी ग्रामपंचायत  परवानगी मागितली असता त्यांच्याकडे परवानगी नसल्याचे सांगत जून मध्ये परवानगी साठी अर्ज केल्याचे सांगण्यात आले.
   ग्रामस्थांनी केलेल्या मागण्या
१) १०० वर्षांपेक्षा जुना असलेल्या कोरेगाव भिमा येथील ऐतिहासिक पुलाचे बांधकाम विभाग व पुरातत्व विभाग यांच्या कडून स्ट्रक्चर ऑडिट करण्यात यावे.
२) ऐतिहासिक पुलाला कुठल्याही प्रकारचा धोका नसून या गॅस पाईप लाईनमुळे भविष्यात जर काही धोका झाला तर त्याला संबधित विभाग ,परवानगी देणारे अधिकारी व संबधित गॅस एजेंसी जबाबदार राहिल.. याचे विशेष लेखी हमीपत्र  देण्यात यावे.
३) कोरेगाव भिमा ग्रामस्थांच्या परवानगीने सदर काम सुरू करण्यात यावे.
       याबाबतचे ग्रामसेवक रतन दवणे यांनी जून , जुलै व ऑगस्ट अशा तीन महिन्यांमध्ये विषय चर्चा केली असून ऑगस्ट महिन्यात परवानगी दिली असल्याचे ग्रामसेवक रतन दवणे यांनी सांगितले.
     यावेळी कोरेगाव भिमाचे  सरपंच विक्रम गव्हाणे,ग्रामपंचायत सदस्य संदीप ढेरंगे, माजी सरपंच विजय गव्हाणे, प्रकाश खैरमोडे,भोकरे, ग्रामसेवक रतन दवणे व कंपनीचे रुपेश कुमार सिंग उपस्थित होते.सर्व परवानग्या घेऊन काम सुरू असून ग्रामस्थांनी मागितलेल्या लेखी हमी बाबत वरिष्ठांशी चर्चा करून काम  सुरू करू असे प्रोजेक्ट मॅनेजर  रुपेश कुमार सिंग यांनी सांगितले.
       कोरेगाव भिमा येथील ऐतिहासिक पुलाला कोणताही धोका निर्माण होणार नाही व त्यांच्या मजबुतीस काहीही धक्का लागणार नसून भविष्यात याबाबत जर काही नुकसान झाले याची जबाबदारी बांधकाम विभाग,परवानगी देणारे संबधित अधिकारी व गॅस एजेंन्सी घेऊन विशेष लेखी हमीपत्र देण्यात यावे.
   ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच संदीप ढेरंगे, माजी सरपंच विजय गव्हाणे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!