उमापुर येथे हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन.. दर्गाह हजरत सय्यद शहानुर बगदादी रहै.यांचा उर्स व ईद मिलादुन्नबी संदल मुबारक संपन्न
चकलांबा पोलीस स्टेशन चे प्रभारी एपीआय नारायण एकाशिंगे आणि सर्व पोलीस प्रशासन यांच्या हस्ते दर्ग्याहवर चादर चढविण्यात आली
चकलांबा -: प्रतिनिधी आरीफ शेख
गेवराई तालुक्यातील उमापुर येथे आज दिनांक २७ सप्टेंबर २०२३रोजी येथील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेले उमापूर येथील दर्गाह हजरत सय्यद शहानुर बगदादी रहै यांचा संदल मुबारक आणि मोहम्मद पैगंबर जयंती (ईद-ए-मिलाद)उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे हजरत सय्यद महेबुब कादरी यांच्या अध्यक्षतेखाली पैगंबर जयंती (ईद-ए-मिलाद) व संदल साजरा करण्यात आला.
यावेळी चकलांबा पोलीस ठाण्याचे अधिकारी नारायण एकशिंगे, पीएसआय इंगळे, अमोल येळे, गाढे, जायेभाये , रुईकर, केदार, खेत्रे व इतर सर्व कर्मचारी यांच्या हस्ते दर्ग्याहवर फुल व चादर चढविण्यात आली. यावेळी हजरत सय्यद महेबूब कादरी, दारुलउलूम निजमिया गेवराई चे अध्यक्ष मौलाना शब्बीर सहाब, सय्यद गालिब साबीर अली राष्ट्रवादी अध्यक्ष अहमदनगर, सय्यद इरफान कलीम कादरी,धोंडू भाई दर्गाह सेवक उमापुर, अन्सारी साहेब सामाजिक कार्यकर्ते गेवराई, अब्दुल भाई सामाजिक कार्यकर्ते गेवराई, तसेच उमापुर येथील पत्रकार ज्ञानेश्वर हवाले, पत्रकार कृष्णा जाधव, रवी कापसे,बाळू मिसाळ ,लहू कापसे, विजय वराट,गणेश टिळेकर,अशोक कापसे ,जावेद शेख,अरबाज तांबोळी, राजू मोरे,भगवान रोकडे,विष्णू राठोड, भाऊ जाधव, शाम कापसे हे उमापुरकर उपस्थीत होते. यावेळी हजरत सय्यद महेबुब कादरी यांनी सर्व पोलीस प्रशासनानी उपस्थिती दिल्याबद्दल त्यांचा हार व शाल सत्कार करुन त्यांचे आभार मानले. आणि हा अशाप्रकारे कार्यक्रम शांततेत पार पडला.