सुनील भंडारे पाटील
सणसवाडी (ता.शिरूर) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने कडकडीत बंदच्या आवाहनाला सकारात्मक व परिणाम कारक प्रतिसाद मिळाला असून सणसवाडी येथील व्यापारी व ग्रामस्थ यांनी कडकडीत बंद पाळला आहे.
शिरूर तालुक्यातील उद्योगनगरी सणसवाडी येथून मिळालेला कडकडीत बंद प्रतिसाद मराठा आंदोलनास ऊर्जा देणारा व प्रेरणा देणारा असून यामध्ये सणसवाडी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहे.या बंदमध्ये व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शरद गवारे, उपाध्यक्ष संतोष मुथा, सचिव अशोक करडे, खजिनदार अशोक ढेकळे बारामतीकर, अल्ताफ इनामदार दिनेश गुंदेच्या, प्रविण गुंदेचा, रमेश चौधरी, नारायण मारुती दरेकर, आसाराम चौधरी, विश्वासराव कवडे, नवोपतलाल मुथा, सलीम खान,खुशबू भाभी ,नंदकुमार चवरे, विठ्ठल दरेकर, गणेश साळवी, शोभा गुडदरे ,बालाजी चंदनशिवे या व्यापाऱ्यांसह इतरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावी अशी मागणी यावेळी सर्वांनी केली,