मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिंब्या साठी आळंदीत आमरण उपोषणस सुरुवात-शोले स्टाईल आंदोलन

Bharari News
0
आळंदी प्रतिनिधी आरिफ भाई शेख
      आळंदी/दिनांक 26 नोव्हेंबर पासून आळंदीत माऊलींच्या मंदिरासमोर साखळी उपोषणाला सुरुवात झाली, उपोषणाचा पाचवा दिवस. आणि मराठा योद्धा मनोज जारंगे पाटलांची खालवलेली तब्येत. ही परिस्थिती सहन झाल्याने टोकाचे पाऊल उचलणाऱ्या मराठा आंदोलक श्रीकांत काकडे यांनी पाण्याच्या टाकीवर चढून सरकारचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी शोले स्टाईल ने आंदोलन केले.
          यावेळी आळंदीतील शांतता कमिटी सदस्य डी डी भोसले पाटील यांनी पोलिसांशी समन्वय साधत श्रीकांत यांची समजूत काढून त्यांना खाली उतरण्यासाठी विनंती करत आंदोलन थांबवायला लावल. आंदोलन यशस्वी करायचे असेल आणि आणखी लढायचे या एकाच ध्येयाने सदर समजूत आळंदीतील डीडी भोसले पाटील यांनी आंदोलकाची काढली होती. आज उपोषणाच्या पाचव्या दिवशी श्रीकांत काकडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरा समोरील महाद्वार चौकातील उपोषण स्थळी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.         याबाबत बोलताना श्रीकांत काकडे म्हणतात की सरकार मराठ्यांना दुय्यम वागणूक देत आहे,त्यांना मराठा समाजाची काळजी नाही, मनोज जरांगे पाटलांची खालवली तब्येत पाहवत नाही आणि त्या वेदना मनाला होतात यासाठी मी शोले स्टाईल आंदोलनाची टोकाची भूमिका घेतली, परंतु आता मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी.मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आमरण उपोषणाला करत आहे. उपोषणाला बसण्याचे आधी श्रीकांत काकडे यांनी माऊलींच्या मंदिरात संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले,     
           तदनंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून उपोषण स्थळी असलेल्या मंचकावर आमरण उपोषणाला त्यांनी सुरुवात केली आहे. समस्त मराठा समाज हा सरकारच्या दुटप्पी भावनेमुळे आक्रमक झालेच दिसून येत आहे. उपोषण स्थळी वारकरी संप्रदायाकडून रोज सायंकाळी हरिपाठ सह भजन केले जात आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मराठा आंदोलन आता आक्रमक होताना दिसत आहे.

         आरक्षण अथवा मरण अशी परिस्थिती भविष्यात निर्माण झाली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे नसेल. कारण हा लढा मराठा समाजातील गरजू लोकांना न्याय मिळण्यासाठी चा असा झाला आहे,दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची खालवलेली तब्येत पाहून  महाराष्ट्रातील अनेक मराठा कार्यकर्त्यांना भावना अनावर होत आहेत. सरकारने लवकर निर्णय घ्यावा यासाठी मराठा समाज,सकल मराठा बांधव आग्रही आहेत,

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!