लोणी काळभोर प्रतिनिधी
आज लोणी काळभोर ,कदमवाक वस्ती (ता हवेली) ग्रामस्थांचा वतीने मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्या साठी कडकडीत बंद ची हाक दिली आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये विविध प्रकारचे आंदोलन करण्यात सुरवात केली आहे.
हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथे सूर्यकांत काळभोर यांनी जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही.तो पर्यंत मी आमरण उपोषण करणार आहे व सकल मराठा समाजाच्या पाठिंब्याने फसवणूक करणाऱ्या,आमदार,खासदार,नेत मंडळी यांना गाव बंदी केली असून..तरी गावामध्ये जो कोणी नेता प्रवेश करेल त्याची नसबंदी केली जाईल अशी जाहीर घोषणाच केली या वेळी केली आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे हि आंदोलनाची प्रमुख मागणी असून..या मागणी साठी सकल मराठा समाज व इतर सर्व समाजाचा जाहीर पाठिंबा मिळत असताना सरकार ला आता कोणतेच डाव खेळता येत नसल्याने राज्य सरकार चांगलेच पेचात पडले आहे..मनोज जरांगे यांचा कडून सरकारने ४० दिवसात आरक्षण देतो असे सांगून समाजाची फसवणूक केली आहे..त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण जनता आता सरकार वर आता कुटल्याच प्रकारे विश्वास ठेवण्यास अपात्र ठरली आहे त्यामुळे सगळी कडे तीव्र आंदोलनाला तीव्र पडसात उमटताना दिसत आहे.माध्यमांशी बोलताना जरांगे यांनी तिसरे आंदोलन सरकारला पेलणार नाही.समाजाचा अंत पाहू नये.असा थेट इशाराच सरकारला दिला आहे.
लोणी काळभोर येथील शेतकरी कुटुंबातील सूर्यकांत काळभोर यांनी या पूर्वी हि बाजार मैदान या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात आंदोलन केले होते.परंतु जरांगे पाटलांनी सरकार दिलेल्या वचनाचा स्वीकार करत उपोषण सोडले होते.पाटलांचा मान ठेवत समर्थनात असणाऱ्या सूर्यकांत काळभोर यांनी आपले उपोषण थांबले.सध्याची परिस्थिती पाहता लोणी व कदमवाक वस्ती ग्रामस्थांनी 1 दिवसीय कडकडीत बंद ठेवण्यास सांगितले आहे.