सुनील भंडारे पाटील
पेरणे फाटा (तालुका हवेली) येथील ऐतिहासिक विजयस्तंभ समोर पुणे नगर महामार्गालगत मोठा खड्डा करून टोरेंट कंपनीच्या वतीने ड्रिल मशीन चे काम चालू केले आहे, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे,
अनेक दिवसांपासून टोरेंट गॅस कंपनीच्या वतीने पुण्याकडून अहिल्यानगर कडे गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम चालू आहे, त्यासाठी टोरेंट कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे तसेच जिल्हाधिकारी पुणे त्याचप्रमाणे इतर परवानगी घेतलेले आहेत, परंतु या परवानगी मध्ये महामार्ग पासून 15 मीटर अंतराच्या बाहेर खोदकाम करून पाईपलाईन टाकावी असे असताना संबंधित कंपनीकडून नियम तोडून राजरोसपणे काम चालू आहे, परवानगी मधील 15 मीटरची नियम व अट आपण पाहू शकता लाल रंगाच्या कॉलम मध्ये रेखांकित केली आहे,
असे असताना ऐतिहासिक ब्रिटिश कालीन विजयस्तंभ परिसरा मधून महामार्गाच्या भागातून मोठे ड्रिल मशीन लावून खोदकाम करण्याचे चालू आहे, प्रसार माध्यमावर एखादी बातमी आली, किंवा एखाद्या तक्रारदाराणे तक्रार दिली, तेवढ्यापुरते दोन-तीन दिवस काम बंद करण्याचे नाटक संबंधित कंपनीकडून केले जात आहे, वातावरण शांत झाले की रात्री अप रात्रीची वेळ गाठून पुन्हा ड्रिल मशीन चालू केले जाते, अशा स्वरूपाचा उद्योग या ठिकाणी चालला आहे,
याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे उप अभियंता राहुल कदम यांनी सांगितले की, काम बंद आहे, रस्त्यालगत काम चालले आम्हाला माहिती नाही, माहिती घेऊन सूचना देतो,