आळंदीत दशक्रिया विधीला नेत्यांच्या भाषणावर बंदी

Bharari News
0
आळंदीत दशक्रिया विधीला नेत्यांच्या भाषणावर बंदी बरोबर च दशक्रिया घाटावर शुल्क आकारले जात नाही असे सूचना फलक हि लावण्याची मागणी

आळंदी प्रतिनिधी
        आळंदीतील दशक्रिया घाटावर पुढाऱ्यांच्या भाषण बंदीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. दशक्रिया विधी पार पडल्यानंतर प्रवचन सेवा झाली की  विविध पुढाऱ्यांची श्रद्धांजलीपर भाषण होतात. काकस्पर्श झाला तरी बोलण्याचा ओघ काही थांबत नाही.
      आणि माइक वर नियोजन करणारा अलंकारिक भाषेत पुढार्‍यांचे नावे घेत.त्रस्त नागरिकांना आणखीन त्रस्त करण्याचे जणू काही निमंत्रणच पुढाऱ्यांना देत असतो.सदर दुःखद प्रसंगांमध्ये कुटुंबावर ओढावलेला घटनेचाही या महाभागांना विसर पडतो. त्यातच माइक वर नियोजन करणारे काकस्पर्श झाला तरीही श्रद्धांजलीपर भाषण करण्यासाठी पुढारी मंडळींना आमंत्रित करत असतात.नोकरी काम, व्यवसाय करणारे,नागरिक उन्हात त्रस्त होतात सकाळच कोवळे उन संपून कडक उन्हाला सुरुवात होते आणि नागरिक अक्षरशः वैतागतात.यावर आळंदीतील दशक्रिया घाटावर प्रवचन सेवा संपल्यानंतर ग्रामस्थांशी विचारविनिमय करून श्रद्धांजली पर पुढाऱ्यांच्या भाषणाला बंदी करण्यात आलेली आहे.असा निर्णय झाल्याचे आळंदी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, माजी नगरसेवक रमेश गोगावले माजी नगरसेवक आनंदराव मुंगसे यावरील मान्यवरांनी ग्रामस्थांशी विचारविनिमय करत सदर बंदीचा निर्णय घेतलेला आहे.
      या भाषण बंदीच्या निर्णयाचे सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे आळंदीतील नागरिकांकडूनही याबाबत चांगले विचार ऐकायला मिळत आहे. आळंदी  पाठोपाठ मरकळ गाव या ठिकाणीही सदरचा निर्णय घेण्यात आलेला आहे सात्वन कमी आणि भाषणे जास्त तसेच मयत व्यक्तीच्या आयुष्याशी संबंध असलेल्या गोष्टींचा सुद्धा यामध्ये बऱ्याच वेळा उल्लेख केला जातो. परंतु दुःखद घटना असल्याने सर्वजण याबाबत बोलण्याचे टाळतात. आठ वाजता सुरू झालेल्या दशक्रिया विधी दहा वाजेपर्यंत चालल्याने नागरिकांना, पाहुणे मंडळींना, नोकर वर्ग, व्यावसायिक,या दशक्रियेला आलेल्या या वर्गाला नाहक त्रास भाषणबाजीमुळे भोगाव लागतो.
      दशक्रिया नंतर श्रद्धांजलीपर भाषण बंदीचा निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेतलेल्या माजी उप नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे. माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे. माजी नगरसेवक रमेश गोगावले माजी नगरसेवक आनंदराव मुंगसे. यांचे आळंदीकर ग्रामस्थांनी अभिनंदन करत आभार मानलेले आहे. त्याच बरोबर आळंदी नगरपरिषदेचा दशक्रिया घाट हा निःशुल्क वापरा साठी आहे असे सूचना फलकही चारी बाजूने दिसतील असे लावावे याची ही मागणी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांचेकडे केल्याची माहिती मिळाली आहे.
      आळंदीत हा ऐतिहासिक निर्णय होण्याची खूप वर्षानंतरची ही पहिलीच वेळ असावी अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे ग्रामस्थांनी संबंधित वरील बंदीचा निर्णय घेणाऱ्या मान्यवरांनी पुढाकार घेत लोकहिताचे असेच निर्णय घ्यावेत अशा अनेक अपेक्षाही या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!