सुनील भंडारे पाटील
मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देऊ नये अशा मागणीसाठी करण्यात आलेल्या साखळी उपोषणामधून आज मराठा क्रांती मोर्चाचे राज्याचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे,
मराठी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठी समाजाच्या वतीने तसेच मराठी क्रांती मोर्चा च्या वतीने वेगवेगळ्या पद्धतीने राज्यामध्ये आंदोलने चालू आहेत, विशेष म्हणजे जालन्यामधून मनोज जरांगे पाटलांनी यामध्ये सर्व ताकतीने उडी घेऊन मराठी समाज एकत्र आणण्याचा मोठा सिंहाचा वाटा उचलला आहे, आरक्षण मिळवण्यासाठी राज्याचे महत्त्वाचे धार्मिक ठिकाण पंढरपूर येथे गेले 69 दिवस साखळी उपोषण चालू आहे, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये मुख्यमंत्र्यांना पूजेची परवानगी देऊ नये या मागणीवर ठाम राहत, मराठा क्रांती मोर्चाचे राज्याचे समन्वयक रामभाऊ गायकवाड आणि त्यांचे इतर सहकारी यांनी जोरदार घोषणाबाजी करत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यालयात घोषणाबाजी केल्यानंतर त्यांना आज अटक करण्यात आली,
महाराष्ट्र राज्याचे मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी सांगितले की राज्य शासनाची ही पूर्णपणे दडपशाही आहे, आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही, राज्य शासनाने या मागणीचा तातडीने विचार करून आम्हाला आरक्षण द्यावे, त्या अगोदर मुख्यमंत्र्यांना मंदिरा मध्ये पूजेची परवानगी देऊ नये, छगन भुजबळ यांना बोलण्याची परवानगी आहे, आणि आपण बोललेले चालत नाही,