आळंदी प्रतिनिधी
आळंदी/पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील केळगाव या ठिकाणी आळंदी पोलिसांनी एका बावीस वर्षे तरुणाला अटक केली आहे,
या बाबत आळंदी पोलीस स्टेशन ने दिलेल्या माहितीनुसार आळंदी देवाची पोलीस स्टेशन हद्दीतील केळगाव या ठिकाणी शुक्रवार दिनांक 17 रोजी सकाळच्या सुमारास तरुण इसम नामे ब्रह्मदेव माधव वय वर्ष 22 राहणार आळंदी यास पोलिसांनी हटकले असता संशयितरित्या उत्तरांमुळे त्याला ताब्यात घेण्यात आले.
सदर प्रकरणी तपासणी केली असता आरोपी ब्रह्मदेव माधव लटपटे याचे कडे देशी पिस्टल रुपये किंमत 30000 आणि सुमारे 500 रुपये किमतीचे जिवंत काढतोस आढळले,सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस शिपाई बाळासाहेब खेडकर यांनी फिर्याद दिली आहे सदर आरोपी तरुणाची सविस्तर सखोल चौकशी करून पुढील तपास आळंदी पोलीस करत आहे,