आळंदी प्रतिनिधी आरिफ भाई शेख
आळंदी/महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये मनोज जरांगे पाटील नावाचे वादळ धडधडत आहे. मराठ्यांच्या लेकरांसाठी आरक्षण,आणि यासाठी झटणाऱ्या मनोज जरांगे पाटलांचे आज श्री तीर्थ क्षेत्र आळंदी पुणे भूमीमध्ये आगमन होणार आहे.
महाराष्ट्राच्या राज्यव्यापी दौऱ्यास सुरुवात झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील नियोजित कार्यक्रमाप्रमाणे आळंदीत भेटीसाठी येत असल्याची माहिती सकल मराठा समाज आळंदी व आळंदी सर्कल आळंदी देवाची यांच्याकडून देण्यात आलेली आहे रात्री माऊलींच्या मंदिरामध्ये आगमन होत संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी दर्शन घेत.भव्य मिरवणूक वारकरी संप्रदायाचा गजर घोषात, नगर प्रदक्षिणा करत,छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ आल्यानंतर. येथून सकल मराठा बांधवांना मनोज जरांगे पाटील संबोधित करतील.
मराठा आरक्षणाचा वणवा पेटला आहे. आरक्षण अथवा मरण.. ही भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतल्यानंतर.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील खेडोपाड्यातील. तळागाळातील. मराठा समाज एक मूठ करत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे उभा राहिला.तेच वादळ आज आळंदीत थडकणार आहे.या ऐतिहासिक क्रांतीचे साक्षीदार होण्यासाठी आळंदीतील सर्व बांधवांनी उपस्थित राहत सहभाग घ्यावा. असे आवाहन सकल मराठा समाज आळंदी व आळंदी सर्कल आळंदी यांच्याकडून करण्यात आलेले आहे.
रात्री नऊ वाजता मिरवणूक होत असून.जंगी स्वागत सकल मराठा समाज आळंदीकर यांच्याकडून करण्यात येणार आहे.तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारका जवळ आल्यानंतर मनोज सारंगे पाटील नेमके काय संबोधतात याकडे आळंदीकर सकल मराठा बांधव.आळंदी सर्कल.समस्त ग्रामस्थ यांचे लक्ष लागून राहिले आहे. रात्री उशीर झाल्यास सकाळी आळंदीतील माऊलींचे दर्शन आणि त्यानंतर तुळापूरला प्रस्थान असा कार्यक्रम असण्याची माहिती मिळत आहे.