सुनील भंडारे पाटील
हवेली तालुक्यातील मुळामुठा नदी तीरावर मांजरी बु.व मांजरी खु.पासून हिंगणगाव, खामगाव टेक पर्यंत कृषी पम्पाला वॉटर मिटर लावण्याच्या व चालू पानपट्टीच्या दहापट पाणी पट्टी आकारणीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी वीस गावातील शेतकऱ्यांनी विरोध केला होता.
वीस ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी हि नको, व वॉटर मिटर हि नको असं ठराव पास केले.सदर ठराव व शेतकऱ्यांच्या बैठकीतील निर्णयाच्या अनुसंगाने कृति समिती अध्यक्ष बापूसाहेब पठारे प्रथम आमदार वडगाव शेरी व अंकुशराव कोतवाल (मा. सरपंच अष्टापूर,कृतीसमिती सचिव) यांनी श्वेता कुराडे कार्यकारी अभियंता खडकवासला प्रकल्प विभाग सिंचन भवन,मंगळवार पेठ पुणे यांना भेटून लेखी निवेदन दिले.
वरिल गावातील कोणत्याही शेतकऱ्यावर मिटर व वाढीव पाणीपट्टीची सक्त्ती करू नये, अन्याय कारक निर्णय त्वरित मागे घ्यावा. अशी विनंती करण्यात आली.सदर निवेदन शासनाकडे पाठवण्याचे व शेतकऱ्यांना न्याय देण्याचे मान्य करून वीस गावातील पुढे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यास उपस्तीत राहण्याचे कुऱ्हाडे मॅडम यांनी मान्य केले.
मुळा मुठा नदीच्या काठावर अनेक गावे बसलेली असून नदीच्या पाण्यावर दोन्ही बाजूला शेकडो एकर शेती, जमीन अवलंबून आहे सद्यस्थितीत पुणे शहर तसेच हडपसर या भागात वाढती रहदारी यामधील सांडपाणी नदीत सोडल्याने नदीचे पाणी अतिशय दूषित झालेली आहे, वास्तविकता मुंढवा भागामध्ये नदीपात्रात कोट्यावधी रुपये खर्च करून जल शुद्धीकरण प्रकल्प बसवण्यात आला आहे, हा प्रकल्प कार्यान्वित नसल्याने आहे तसे घाण पाणी पुढे अनेक गावांमधील शेतीला पुरवले जाते,
पाणी शुद्ध केले तर शेतीला फायदेशीर मग पाणीपट्टी आकारणी योग्य, परंतु घाण पाणी देऊन शेतकऱ्यांना पाणीपट्टी आकारणी मान्य नसल्याने ही पाणीपट्टी तातडीने बंद करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे, अन्यथा भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे,