हवेली प्रतिनिधी
बाभुळसर बु येथील पद्मश्री डॉ आप्पासाहेब पवार माध्य विद्यालय बाभुळसर बु (ता शिरूर) जि पुणे विद्यालयाची एस एस सी परीक्षेत ९१.८० % गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त माजी विद्यार्थिनी व नागवडे छाया मॅडम यांची कन्या अनुष्का सुनिल नागवडे हिस रशिया येथे मेडिकल शिक्षणासाठी विद्यालयाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक जे डी पवार सर,परिक्रमा शैक्षणिक संकुलचे संचालक,हनुमंत पाटोळे, स्थानिक स्कुल कमिटीचे अध्यक्ष अंकुश आबा नागवडे,कविता पाटोळे सदस्या ग्रा पं. ,मा उपसरपंच राजेंद्र आबा नागवडे घुटे सर,कोठारे सर,खामकर सर, रुपणर सर ,डाके सर,पाटोळे मॅडम अनिकेत शितोळे व हनुमंत देशवंतसर,महेंद्र रणदिवे, बाळासाहेब राऊत,संतोष नागवडे,शाम सुळ आदी सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांनी अनुष्का हिस रशिया येथे मेडिकल कॉलेज शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.