सुनील भंडारे पाटील
संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागून असलेली महत्त्वाची स्पर्धा म्हणजे लाल मातीचा खेळ महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचे खेळाची तारीख ठरली असून येत्या ६ नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत नेताजी सुभाष चंद्र बोस सैनिकी शाळा फुलगाव, तालुका हवेली जिल्हा पुणे येथे स्पर्धा होणार आहे,
याबाबत पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पैलवान संदीप आप्पा भोंडवे यांनी माहिती दिली असून अनेक दिवसांच्या प्रतीक्षेला अखेर निर्णय झाला असून ऐन दिवाळीत येऊन ठेपलेल्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचा किताब कोण पटकावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, पुणे जिल्ह्यातील पूर्व हवेली मध्ये ही स्पर्धा दुसऱ्यांदा होत आहे, या अगोदर देखील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन लोणीकंद या ठिकाणी झाले होते, यावर्षी फुलगाव या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन नेताजी सुभाष चंद्र बोस, सैनिकी शाळेच्या प्रशस्त अशा मैदानामध्ये होत असून, या स्पर्धेचा आनंद पुणे बरोबर संपूर्ण महाराष्ट्र घेणार आहे,