सुनील भंडारे पाटील
आपटी (तालुका शिरूर) गावच्या पोलीस पाटील पदी विकास सुभाष ढगे यांची नुकतीच नियुक्ती झाली असून शिरूर तालुक्यामधील पोलीस पाटील पदाचा रिक्त जागांसाठी परीक्षा घेण्यात आली होती, आपटी गावांमधील पोलीस पाटील रिक्त जागेसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये गुणवत्ता मिळून ढगे यांची नियुक्ती करण्यात आली,
शिरूर तालुक्यातील काही गावांमध्ये पोलीस पाटलांच्या जागा रिक्त होत्या त्यासाठी नुकतीच परीक्षा घेण्यात आली, यामधे आपटी येथील रिक्त जागेवर कु. विकास सुभाष ढगे (पाटील) यांची अवघ्या पंचवीसव्या वर्षी वर्णी लागली. पुणे जिल्ह्यामधे सर्वात तरुण पोलीस पाटील म्हणून नोंद लागल्याने सर्वच माध्यमातून शुभेच्छा देण्यात येत आहे,आपटी गावातील तरुणांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. पोलीस पाटील परीक्षेचा निकाल लागल्यानंतर लगेचच शिरुर- हवेलीचे कार्यसम्राट आमदार ॲड. अशोक बाप्पु पवार यांनी दूरध्वनी द्वारे शुभेच्छा दिल्या.
आपटी गावातील रिक्त पोलीस पाटील जागेसाठी, खुल्या गटामधून सुमारे 19 अर्ज दाखल झाले होते, त्यामध्ये सर्वात जास्त गुण मिळून ढगे यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले, विकास ढगे यांनी यापूर्वी पोलीस भरती साठी प्रयत्न केले असता 1 मार्कावरून त्यांना अपयश आले, म्हणून नाही पोलीस,पोलीस पाटील तरी असे म्हणावे लागेल,
गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबत, कोणताही गट तट न धरता पारदर्शकपणे काम करणार असल्याचे नवनिर्वाचित पोलीस पाटील ढगे यांनी सांगितले आहे. नियुक्तीनंतर शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार, रांजणगाव गणपती ट्रस्टचे सचिव तुषार पाचुंदकर, वढु बुद्रुक चे पोलीस पाटील जयसिंग भंडारे, निमगाव चे पोलीस पाटील किरण काळे, कोंढापुरीचे पोलीस पाटील राजेश गायकवाड, केंदूरचे पोलीस पाटील सुभाष साकोरे आदी उपस्थित होते,