सुनील भंडारे पाटील
वढू बुद्रुक (तालुका शिरूर) ग्रामपंचायत कार्यालय येथे आज झालेल्या ग्रामसभेमध्ये गावाच्या हद्दीमधील प्लॉटिंग व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना मोठा दणका बसला असून अवैध प्लॉटिंग व्यवसाय आता चालणार नाही आज झालेल्या ग्रामसभेमध्ये सर्वानुमते हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला,
सुमारे 200 गणसंख्या उपस्थित असणाऱ्या या सभेमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयावर निर्णय घेण्यात आले, सभेच्या कामकाजामध्ये प्रथमता मागील सभेच्या कामकाजाची प्रोसिडिंग वाचून दाखवण्यात आले, 2024-25 या वर्षाचे अंदाज पत्रक मंजुरी, लेबर बजेट, आवास योजना लाभार्थी निवड, सहामाही जमा खर्च मंजुरी, 15 वा वित्त आयोग, ऐनवेळी उपस्थित झालेले मुद्दे,
तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे वढू बुद्रुक मधील आज झालेल्या ग्रामसभेने प्लॉटिंग व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत, यापुढे अवैध प्लॉटिंग व्यवसाय पूर्णपणे बंद होणार असून लोकांच्या फसवणुका देखील कमी होणार आहे, वढू बुद्रुक ग्रामस्थांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे,
पुणे जिल्यातील पूर्व हवेली पट्ट्या मध्ये अवैध प्लॉटिंग व्यवसायिकांचा सुळसुळाट झाला असून सर्व गावांमधील ग्रामपंचायतिनी असे निर्णय घेण्याची गरज आहे,