प्रतिनिधी हवेली
पेरणे ( ता हवेली ) येथील ऐतिहासिक विजय स्तंभ पेरणे फाटा व कोरेगाव भीमा ऐतिहासिक पुलाखालून जाणारी भूमिगत गॅस पाईपलाईन इतर ठिकाणी स्थलांतर करण्याबाबत दि १० नोव्हेंबर २०२३ रोजीचे दिलेल्या पत्राची दखल न घेता काम सुरु ठेवले असून त्यामुळे विजयस्तंभासमोर दि ५ नोव्हेंबर २०२३ रोजी रस्ता रोको व आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा पीपल्स रिपब्लकन पार्टी दलीत मुक्ती सेनेच्या रमाई ब्रिगेडच्या पुणे जिल्हाध्यक्ष लताताई शिरसाट यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात आपल्या निवेदनाद्वारे दिला आहे .
सार्वजनिक बांधकाम विभाग व लोणीकंद पोलीस ठाण्यात तसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र व्यवहार करण्यात आला असून आपल्या कार्यालयाने कार्यालयीन कामकाज संहिता व सामान्य नागरिकांच्या सेवा अधिकाराची पायमल्ली करत आम्हांस कोणताच पत्रव्यवहार करत उत्तर दिले नाही यामुळे आपले सदर कंपनीशी 'अर्थपूर्ण' संबध आहेत काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे.
सदर पत्रान्वये आपण टोरंट गॅस पुणे लि. यांच्या गॅस पाईपलाईन मुळे ऐतिहासिक पुलाला कोणताही धोका नसत्याबाबत बांधकाम विभागाच्या वतीने संबंधित अधिकाऱ्याने स्वताच्या जबाबदारीने हमीपत्र लिहून देण्यात यावे तसेच दुर्दैवाने या कंपनीच्या गॅस पाईपलाईन मुळे भीमा नदी वरील पुलास धोका निर्माण झाल्यास किंवा जीवित हानी झाल्यास केंद्र, राज्य जिल्हा प्रशासन व कंपनी व्यवस्थापण यास ते जबाबदार राहतील तसेच यांच्या कडून मिळणारी नुकसान भरपाई व तिचे प्रत्येक जीत, मालमत्ता यांच्या बाबत मिळणारी नुकसान भरपाई व तिचे स्वरूप कशा प्रकारे आहे याचा खुलासा करण्यात यावा.
अचानक एखादी दुर्घटना झाल्यास त्याबाबत देण्यात येणारी अत्यावश्यक सेवा.अग्निशमन दल, आग, नियंत्रण व्यवस्था आवश्यक व पर्यायी व्यवस्था याबाबत सविस्तर माहिती देण्यात यावी तसेच संबंधित टोरंट गॅस कंपनीचे खोदकाम तातडीने थांबवण्यात येऊन सदर टोरंट गॅस पाईप लाईन स्थलांतरीत करण्यात यावी.याबाबत निवेदन देऊनही आपल्या कार्यालयाकडून कोणताही पत्र व्यवहार करण्यात आलेला नाही आपण पत्राला उत्तरही वेळेत न देता, कचऱ्याची पेटी दाखवत म्हणून
सदर पाईपलाईन स्थलांतरित जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करण्यात येणार असून तरी सदर बाब पुणे जिल्हाधिकारी व बांधकाम विभाग यांस जबाबदार राहणार आहोत याची नोंद घ्यावी असे लताताई शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले,5 नोव्हेंबर रोजी चालू होणाऱ्या उपोषण ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे भेट देणार आहेत,