शिवसेने तर्फे आळंदीत वारकरी साधकांना दिवाळी फराळ वाटप

Bharari News
0
आळंदी प्रतिनिधी
       मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तर्फे शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वात आळंदीतील वारकरी भाविक, नागरिक यांचेसह शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, शिवदूत मार्गदर्शक, सल्लागार यांना दिवाळी निमित्त दिवाळी फराळ, मिठाईचे वाटप शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुण्यस्मरण दिना निमित्त आळंदीत वाटप करीत अभिवादन करण्यात आले.
    यावेळी पुणे जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, उपजिल्हा प्रमुख प्रकाश वाडेकर, आळंदी शहराध्यक्ष राहुल चव्हाण, उपतालुका प्रमुख योगेश पगडे, विभाग प्रमुख राहुल थोरवे, शिव सहकार उप तालुका प्रमुख शंकर घेनंद, माऊली गुळुंजकर, प्रदीप कुऱ्हाडे, माजी उपसरपंच शिवाजी पगडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रकाश वाडेकर यांनी मार्गदर्शन करीत दिवाळी फराळ वाटप उपक्रमाची माहिती देत. सर्व सामन्याची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्य शासनाचे माध्यमातून रेशनिंग धारकांना वेळेवर आनंदाचा शिधा देऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य करण्यात आल्याचे वाडेकर यांनी सांगितले. त्याच प्रमाणे महिलांना एस टी प्रवास सवलत ५० टक्के करून देण्यात आली आली आहे. या उपक्रमाचे राज्यात स्वागत करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुण्य स्मरण दिना निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!