युनिट 6 ची धडाकेबाज कामगिरी, राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात दरोडा व घरफोड्या करणारे आरोपीस केले जेरबंद

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील
               महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात दरोडा व घरफोडी करणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट 6 शाखा पुणे शहर यांच्या पथकाने धाडसी कामगिरी करत जेरबंद केले आहे,
              पुणे शहरातील जबरी चोरी, घरफोडी व वाहन चोरी याबरोबर इतर गुन्ह्यांना आळा बसावा याकरिता पोलीस खात्यातर्फे सद्यस्थितीत तीव्र मोहीम राबवली जात आहे, यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यामार्फत आदेश आले होते, गुन्हे युनिट 6 मार्फत तपास चालू असताना, पो ना नितीन मुंडे यांच्या बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, गुन्ह्यातील मुख्य आरोपी हंसराज रणजीतसिंग टाक हा हडपसर येथे येणार आहे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट 6, रजनीश निर्मल, यांचे मार्गदर्शनाखाली इतर पोलीस अधिकारी यांनी सापळा रुचून रणजीत टाक वय 18 वर्ष (रा, तुळजाभवानी वसाहत, गाडीतळ हडपसर पुणे), यास अटक केली आहे, त्याला पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आले आहे, त्यामध्ये त्यांनी सदरचे गुन्हे केल्याचे व मुद्देमाल देण्याचे कबूल केले आहे, तसेच घरफोडी व चोरी केल्याची ठिकाणी दाखवत आरोपी टाक याने सांगितल्याप्रमाणे 111 ग्राम सोन्याचे दागिने किंमत 6,10,500/- असा मुद्देमाल काढून दिला आहे,
                    आरोपी टाक याच्या सखोल तपासांती नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत, पुण्यामध्ये हडपसर, लोणी काळभोर, कोंढवा, लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत, त्याचप्रमाणे अहिल्यानगर कोतवाली, सोलापूर एमआयडीसी, सोलापूर जेल रोड, सोलापूर फौजदारी चावडी, सोलापूर ग्रामीण वळसंग, हडपसर या पोलीस स्टेशनमध्ये आरोपी असल्याचे उघडकीस आले आहे, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 6 रजनीश निर्मल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळकेहे करीत आहेत,
                  सदरची कामगिरी रितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर, रामनाथ पोकळे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, अमोल झेंडे पोलीस उपायुक्त गुन्हे, सतीश गोवेकर सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 6 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, सुरेश जायभाई, पोलीस अंमलदार विठ्ठल खेडकर, नितीन मुंडे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकाटे, प्रतीक लाहीगुडे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टाकवणे,सचिन पवार, नितीन धाडगे, महेंद्र कडू, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!