सुनील भंडारे पाटील
पेरणे (तालुका हवेली) येथील पाटील वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी मृत्यूमुखी पडली असून परिसरामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे,
बुर्केगाव येथे एका चार वर्षे वयाच्या बालिकेवर बिबट्याने प्राण घातक हल्ला केला होता, ही घटना ताजी असतानाच काल सायंकाळी पेरणे येथील पाटील वस्तीवर राहणाऱ्या बबन हनुमंत वाळके यांच्या गोठ्यामधील शेळीवर बिबट्याने हल्ला करून ठार केले, त्यामुळे परिसरामध्ये ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे, या भागामध्ये महावितरणचे विद्युत लोड शेडिंग असल्यामुळे शेतकऱ्यांना कृषी पंप चालू करून रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून शेतमालाला पाणी द्यावे लागते, विचार करण्याची बाब आहे, जगाचा पोशिंदा, शेतमाल अन्नधान्य पिकवून माणसांना जगवणारा शेतकरी आपल्या जीवाचा विचार न करता रात्री अपरात्री शेताला पाणी देण्याचे काम करत आहे,
भीमा नदीच्या काठावर बसलेले अनेक गावांमध्ये प्रमुख पीक उसाचे असल्याने या भागात कायम बिबट्याचे अस्तित्व आहे, शेतकऱ्यावर अनेकदा हल्ले झालेत रोज कुठे ना कुठे बिबट्याचे दर्शन होते, अलीकडच्या काळात माणसांवर बिबट्याचे हल्ले वाढू लागले आहेत, कदाचित हे बिबटे नरभक्षक झाल्याचे वातावरण या ठिकाणी तयार झाले आहे, आत्तापर्यंत झालेले सर्व बिबट्याचे हल्ले सायंकाळी सहानंतर रात्रीच्या वेळी झाले आहेत,
पेरणे येथील वाळके यांच्या गोठ्यामधील शेळीवर हल्ला केल्यानंतर शेळी मृत्युमुखी पडली असून बिबट्याच्या हल्ला करण्याच्या घटना पाहता शिरूर हवेली तालुक्याचे कार्यसम्राट आमदार यांनी तातडीने वनरक्षक अधिकाऱ्यांना त्वरित या भागात बिबट्याचा बंदोबस्त, तसेच बिबट्या पकडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे सांगितले, वनअधिकारी यांच्या वतीने संबंधित ठिकाणी पंचनामा करण्यात आला आहे,
या भागामध्ये दिवसेंदिवस बिबट्यांचे हल्ले वाढत चालले आहेत, वन खात्याने तातडीने पिंजरे लावून बिबट्याला पकडावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे,