प्रतिनिधी अनिकेत मुळीक
लोणी काळभोर परिसरातील एका महिलेचे योग्य वेळी उपचार न मिळाल्याने निधन झाले. असून सगळी कडे हळहळ व्यक्त केली जात आहे. पुणे-सोलापूर महामार्गा हा सरळ असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात रोजची वाहतूक होत असते.त्यात प्रचंड वाहतूक कोंडी मुळे नागरिक सततच्या वाहतुक कोंडीने हैराण झाले आहेत. वाहतुक शाखेचे पोलीस सुध्दा या कोंडीने या बाबत हतबल झाले असुन कोंडी सोडवण्यासाठी कसोटीचे प्रयत्न करत आहेत. या पूर्वी हि लोणी स्टेशन, एम आय टी कॉर्नर येथे अनेक अपघात झाले आहे. बेशीस्थ वाहतूकोंडीमुळे अपघात होतात.परंतु वाहतूकोंडीमुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला हि खूप लज्जा स्पद बाब आहे. वाहतूक पोलीस शिस्त लावतील का? का प्रकार गांभीर्याने घेतली याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार लोणी काळभोर येथील पाषाणकर बागेतील लीलावती शेंडगे( वय ५८ ) या महिलेला हृदयविकाराचा झटका आला असता हॉस्पिटलमध्ये नेताना वाटेतच त्यांचे निधन झाले आहे.त्यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास दिवसेंदिवस नागरिकांना बसत असून वाहतूक पोलीस याबाबत कशी उपाययोजना करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून उरळी ते हडपसर पर्यंत पर्यायी रस्त्यांचा वापर सुरू करावा तसेच ते रस्ते दुरुस्त करून घ्यावे अशी नागरिकांची मागणी आहे.