सुनील भंडारे पाटील
सुधारीत तंत्रज्ञानाच्या मार्गावर जेवढा फायदा आहे, त्याच बरोबर समाजाला त्याचे तोटेही सहन करावे लागत आहेत, व्हाट्सअप-फेसबुकच्या माध्यमातून संपूर्ण माहिती चोरून हॅकर्स समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ऑनलाइन तसेच फ्रॉड कॉलच्या माध्यमातून पैसा कमवण्यासाठी लोकांच्या जीवनाशी जीव घेणा खेळ खेळत आहेत, यापुढे मात्र सायबर क्राईम विभाग मात्र हतबल होत आहे,
डिजिटल इंडिया उराशी बाळगत संपूर्ण देश आज ऑनलाइनच्या दिशेने वाटचाल करत आहे, परंतु व्यवहार करताना किंवा व्यवहारामध्ये ऑनलाइन चा वापर करत असताना संपूर्ण ज्ञान संबंधित व्यक्तीला आहे का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, संपूर्ण जग आज मोबाईल मध्ये कैद झाले आहे, वेगवेगळ्या ॲप्सच्या माध्यमातून रोजचे दैनंदिन कामकाज सोपे झाले असून समाजाला या सर्व ॲप्सच्या सोयी सुविधांचे प्रशिक्षण अथवा ज्ञान घेणे गरजेचे आहे जलद चाललेल्या या सुधारित तंत्रज्ञानाचा साईड इफेक्ट देखील होत आहे, ज्ञान नसणाऱ्या व्यक्तीकडून काही महत्त्वाच्या एक्सेस अलौ झाल्या तर संपूर्ण माहिती हॅकर्स चोरतात, त्यानंतर संबंधित व्यक्तीला ब्लॅकमेलिंग करण्याचे काम चालू होते, जवळच्या व्यक्तींना फोन करणे, व्हिडिओ कॉल्स अश्लील क्लिप बनवून व्हायरल करणे, मोबाईल स्क्रीनचा ताबा घेत बँक अकाउंट वरील पैसे ट्रान्सफर करणे,फ्रॉड कॉल चा वापर करून लोकांच्या जीवाशी खेळणे, असे प्रकार समाजात वाढू लागले आहेत,
हॅकर्सच्या या ऑनलाइन फसवणुकांचा समाजामध्ये विपरीत परिणाम होत असून कित्येकांना जीव गमवावा लागला आहे, दिवसाढवळ्या चाललेले या लुटीमुळे मानसिक ताणतनाव सहन न झालेल्या लोकांना आत्महत्या करण्याची वेळ येत आहे, समाजात अनेक अशा घटना घडल्या आहेत, या संदर्भात तक्रारी दाखल होऊन देखील आरोपी सापडत का नाही?, अशा आरोपींना पकडून समाजासमोर उभे का केले जात नाही, असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे, ऑनलाइन फसवणकांचे प्रमाण वाढत चालले असून, सायबर क्राईम विभाग हतबल झाला की काय? अशी चर्चा लोकांमध्ये चालू आहे,
कोणाला काही देणे घेणे नाही, अशा फसवणुका पासून वाचायचे असेल तर प्रत्येकाने आपल्या मोबाईल मधून गेलेल्या सर्व परमिशन्स तातडीने बंद कराव्यात तसेच असा प्रसंग कोणाच्या बाबतीत घडत असेल तर तातडीने पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करावी संपादक भरारी न्यूज, अध्यक्ष राज्य मराठी पत्रकार परिषद,पुणे जिल्हा,सुनील भंडारे (पाटील),