अनिकेत मुळीक प्रतिनिधी
हडपसर( ससाणे नगर) पुणे शहर आणि परिसरात जबरी चोरी व मोबाईल चोरी करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या (युनिट ५) पथकाने ताब्यात घेतले असून. त्यांच्याकडून तब्बल १० गुन्हे उघडकीस आणून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. युनिट पाचच्या पथकाने ही कारवाई हडपसर परिसरातील ससाणेनगर येथे केली आहे.
पुणे शहरात मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश (रितेश कुमार IPS ) पुणे यांनी गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाला देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पथक हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी मिळालेल्या माहितीवरुन एका अल्पवयीन मुलाला ससाणेनगर येथून ताब्यात घेण्यात आले. अंग झडती घेतली असता.त्याच्याकडून १० मोबाईल जप्त केले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने अल्पवयीन मित्राच्या मदतीने पुणे शहरातील विविध परिसरातून मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून १ लाख ४५ हजार ५०० रुपये किमतीचे १० मोबाईल व एक दुचाकी जप्त केली,
आरोपीकडून चाकण, चंदननगर, वानवडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक, हडपसर पोलीस ठाण्यातील तीन, विमानतळ पोलीस ठाण्यातील २, लोणावळा पोलीस ठाण्यातील 2 असे एकूण १० गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, चैताली गपाट, पोलीस अंमलदार आश्रूबा मोराळे, दया शेगर, रमेश साबळे, पल्लवी मोरे, राजस शेख, प्रताप गायकवाड, पृथ्वीराज पांडुळे, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, दाऊद सय्यद, अकबर शेख, अमित कांबळे, शहाजी काळे, शशिकांत नाळे, विलास खंदारे, पांडुरंग कांबळे यांच्या पथकाने केली.