सुनील भंडारे पाटील
40 हजारांची लाच मागणी करत तडजोडी अंती प्रत्यक्ष 8000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना मंचर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण चा सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सुरेश साळुंखे वय 44 वर्ष, तसेच पोलीस शिपाई संदीप भीमा रावते वय 36 वर्ष, या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी रंगे हात पकडले,
याबाबत मंचर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार याची अपघातामधील गुन्ह्यातील दुचाकी वाहन परत देण्यासाठी मदत करतो म्हणून साळुंखे व रावते या दोघांनी 40 हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांना प्राप्त झाली होती, कारवाई करण्यासाठी दिनांक 23/12/2023 रोजी सापळा रचण्यात आला,सदर तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी दरम्यान या दोघांनी चाळीस हजार रुपये लाचेची मागणी करत प्रत्यक्ष 8000 रुपये लाचेची रक्कम पंचां समोर स्वीकारताना रंग हात पकडले,
सदरची कारवाई अमोल तांबे पोलीस अधीक्षक, डॉक्टर शितल जानवे अप्पर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विद्युलता चव्हाण,पोलीस हवालदार नवनाथ वाळके,महिला पोलीस हवालदार सरिता वेताळ, चालक पोलीस हवालदार कदम लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या पथकाने केली,