आंबेगाव प्रतिनिधी प्रमिला टेमगिरे
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेत समावेश असलेल्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा थोरांदळे (ता आंबेगाव) येथे यशवंतराव चव्हाण कला ,क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत बीटस्तरीय स्पर्धा पार पडल्याची माहिती मुख्याध्यापक दिलीप केंगले यांनी दिली.
बीटस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन मंचर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बळवंत मांडगे ,सरपंच जे.डी.टेमगिरे,माजी सरपंच सिताराम गुंड,विस्तार अधिकारी गजानन पुरी,केंद्रप्रमुख मनोहर सांगळे,शा.व्य.स.अध्यक्ष नितीन टेमगिरे,उपाध्यक्ष दिनेश टेमगिरे व सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत झाले.बक्षीस वितरण गटविकास अधिकारी प्रमिला वाळूंज ,गटशिक्षण अधिकारी सविता माळी,केंद्रप्रमुख साहेबराव शिंदे,म्हातारबा कोंढावळे,बाळासाहेब आडके,उपसरपंच संदिप टेमगिरे,बाळासाहेब टेमगिरे,दिनकर विश्वासराव,सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्याहस्ते झाले.
विजेत्यांना मिळालेले बक्षीस सागर विश्वासराव,योगेश टेमगिरे,अजित फुटाणे,रमेश हुंडारे,तानाजी गुंड,जय हनुमान मशिनरी,जिजाई अमृततुल्य , जय हनुमान इलेक्ट्रीकल,रमेश टेमगिरे,खंडू पुंडे,शिक्षकवृंद थोरांदळे यांच्यावतीने देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार शिंदे यांनी केले व राज्यपुरस्कार विजेते शिक्षक बाळासाहेब कानडे यांनी आभार मानले.
थोरांदळे शाळेने तब्बल १७ स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.स्पर्धेची व्यवस्था इंदू नाचर,वंदना वायाळ,चेतन बेन्ढारी,शैला थोरात,संदीप शिंदे,प्रमिला लोखंडे,नौशाद तांबोळी,ओमकार मांडे,अनिकेतआवटे,मेघा टेमगिरे ,चांडोली केंद्रातील सर्व शिक्षक व समस्त ग्रामस्थ थोरांदळे यांनी पहिली. स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे - धावणे ५० मीटर मुले प्रथम-सोहम स्वप्नील घुले (चांडोली बु.) मुली प्रथम-अनुष्का संदिप गुंड (थोरांदळे),धावणे १०० मीटर मुले प्रथम-अथर्व गणेश शेळके (थोरांदळे),मुली-साईशा अविनाश मिंडे (थोरांदळे),गोळाफेक मुले प्रथम-अथर्व गणेश शेळके (थोरांदळे), मुली प्रथम- दिप्ती रविंद्र थोरात (थोरांदळे),थाळीफेक मुले प्रथम-अथर्व गणेश शेळके (थोरांदळे),मुली प्रथम-श्रावणी बाळासाहेब मिंडे (थोरांदळे),उंच उडी लहान गट मुले प्रथम-सनी रामजनक विश्वकर्मा (मोरडेवाडी),मुली प्रथम-श्रावणी भावेश कांबळे (मोरडेवाडी),उंच उडी मोठा गट मुले प्रथम- ओम सुनिल इंदोरे (थोरांदळे),मुली प्रथम -साईशा अविनाश मिंडे(थोरांदळे),लांबउडी लहान गट मुले प्रथम-समर्थ अल्पेश पोखरकर (पिंपळगाव),मुली प्रथम-शिवानी बाळू केदार (चांडोली बु.),लांबउडी मोठा गट मुले प्रथम-ओम सुनिल इंदोरे (थोरांदळे),मुली प्रथम -साईशा अविनाश मिंडे (थोरांदळे),वक्तृत्व लहान गट प्रथम-स्वरा प्रविण जाधव (चांडोली बु.),वक्तृत्व मोठा गट प्रथम- पृथ्वीराज केशव टेमकर (चांडोली खुर्द),प्रश्नमंजुषा लहान गट प्रथम- पिंपळगाव शाळा,प्रश्नमंजुषा मोठा गट प्रथम-थोरांदळे शाळा,कबड्डी लहान गट मुले प्रथम-चांडोली खुर्द,कबड्डी लहान गट मुली प्रथम-शिंगवे,कबड्डी मोठा गट मुले प्रथम-थोरांदळे,कबड्डी मोठा गट मुली प्रथम-शिंगवे,खो खो मोठा गट मुले प्रथम-थोरांदळे,खो खो मोठा गट मुली प्रथम-थोरांदळे,खो खो लहान गट मुले प्रथम-थोरांदळे,खो खो लहान गट मुली प्रथम-थोरांदळे,भजन लहान गट प्रथम-चांडोली बु.,भजन मोठा गट प्रथम -शिंगवे,लेझीम लहान गट मुले प्रथम- मंचर क्र.१,लेझीम लहान गट मुली प्रथम-पेठ,लेझीम मोठा गट मुले प्रथम-मोरडेवाडी,लेझीम मोठा गट मुली प्रथम-वळती,लोकनृत्य लहान गट प्रथम-पिंपळगाव , लोकनृत्य मोठा गट प्रथम-शिंगवे .वरील सर्व खेळाडूंना तालुकास्तरावर खेळायची संधी मिळणार आहे.