प्रतिनिधी वैभव पवार
जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून पेरणेफाटा (ता हवेली) तापकीर वस्ती येथे पंक्रोशीतील बंधु भगिनी यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला.सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून जीवन टोपे, अध्यक्ष प्रहार संघटना खेड तालुका, सुनील चोरडिया -अपंग केंद्र चिंचवड, सुधाकर मोरे - फिजिओथेरपीस्ट,ज्योती हिवरे -शिरूर तालुका अध्यक्ष प्रहार संघटना,नीता ढवाण पाटील - राष्ट्रवादी प्रदेश दिव्यांग सेल
अनिता जाधव सामाजिक कार्यकर्ता,सि. लुसी कुरियन संस्थापिका माहेर संस्था, वढू बु.उपस्थित मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
अपंग केंद्रातील बांधवानी भक्ती गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आनंद गलांडे या अंध बांधवाने मोबाईल चा वापर यावर प्रात्यक्षिक करून दाखवले.
रेश्मा कडलग या एका पायाने अपंग भगिनीने तोड दे बंधन सारे या गीतावर नृत्य सादर केले उपस्थितानी टाळ्याच्या गजरात प्रतिसाद दिला.यानंतर 2022 साली कळसुबाई शिखर पार केलेल्या दिव्यांग बांधव नवनाथ वर्पे, राजेंद्र सुपेकर, सतीश अळकुटे, अर्चना डोंगरे, जीवन टोपे, रघुनाथ सातव, किरण शिंपी यांचा माहेर संस्थेच्या संस्थापिका सि. लुसी कुरियन यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.
सुनील चोरडिया यांनी माहेर संस्थेचे विशेष जाहीर आभार मानले, संस्थेचे अपंगा प्रति असणारे प्रेम दिसले. आपण दर वर्षी अपंग दिन साजरा करतो बांधवाना वस्तु देतो धान्य देतो यापेक्षा त्यांना उद्योग मिळवून द्यावा जेणे करून ते सक्षम होतील.
संस्थापिका सि. लुसी कुरियन यांनी हे सगळे काम स्टाफ मुळेच शक्य आहे. आपण सगळे या दिव्यांग बांधवासाठी कुठल्या योजना आणता येईल ते पाहतो.. तुम्ही सगळे आलेले पाहून आनंद वाटला.मंगल गर्जे - मी माहेर संस्थेत बॅगचा व टेलरिंग चा क्लास केला आहे ते केवळ तेजस्विनि मॅडम यांचे सहकार्य यामुळे मी आता घरी ब्लाउज चे क्लास घेते दिवसाला 1000 ते 1200 कमवत आहे मी सक्षम आहे.
शेवटी नीता ढवाण यांनी त्यांच्या मनोगता मध्ये आपण सर्वजण मिळून समूह व्यवसाय करु, याबाबत प्रस्ताव देणार आहे कि कसे दिव्यांग बांधवाना आर्थिक सक्षम करता येईल ते पाहू, जेणे करून त्यांना हक्काचा व्यवसाय मिळेल कुणाकडे हात पासरायची गरज राहणार नाही. सोबत जास्तीत जास्त प्रमाणात शासकीय योजना मिळवून देता येईल ते पाहू.कार्यक्रमाचे नियोजन तेजस्विनी पवार, तंत्रज्ञान प्रकल्प प्रमुख व सुमित इंगळे यांनी केले तर त्यांना स्वाती पाटील, संजय इंगळे, सुनील कांबळे, प्रेसेंजित गायकवाड व माहेर संस्थेतील मुले यांनी मोलाचे सहकार्य केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुनील कांबळे यांनी केले तर प्रास्ताविक सुमित इंगळे, आभारप्रदर्शन तेजस्विनी पवार यांनी केले.