सुनील भंडारे पाटील
दरेकरवाडी (ता.शिरूर) येथे मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी स्मार्ट अंगणवाडी सुरू करण्यात आली असून नुकतेच अंगणवाडीचे पाटीचे उद्घाटन सर्व लहान मुलांच्या हस्ते करण्यात आले आहे.या मध्ये नर्सरी,ज्युनियर के.जी.,सिनियर के.जी., या प्रमाणे वर्ग चालू करण्यात आले आहे.
ही नविन संकलपणा सर्व पालकांनी आपल्या मुलांसाठी सुरु केली शिक्षणासाठी मोठ्या मोठ्या संस्थेलां ४०-५० हजार रुपये फी भरुन शिक्षण घेण्या पेक्षा अगदी कमी पैसे मध्ये आपल्या सरकारी संस्था मध्ये पालकांनी लक्ष घालून तीच संस्था चे शिक्षण इतर इंग्लीश माध्यम सारखे सरकारी संस्था मध्ये चालु केले आहे. जेणेकरून पालकांची पैशांची बचत होईल आणि मुलांना चांगले शिक्षण सुद्धा घेता येईल. नवीन संकल्पनेची माहिती संदिप काळूराम दरेकर यांनी सर्व ग्रामस्थांना आणी पालकांना दिली, माजी सरपंच प्रमिला दरेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नंतर मुलाना पुस्तक वाटप करण्यात आले तसेच नवीन शिक्षिका म्हणून नितिशा अविनाश दरेकर यांचे स्वागत सर्व मुलांनी फुलें देऊन केले.या वेळी अंगणवाडी लां आर्थिक मदत करण्यासाठी पालक बरोबर ग्रामस्था मध्ये माजी सरपंच विक्रम दरेकर, कालिदास गणपत दरेकर, राहुल काळूराम दरेकर, तुकाराम साळुंके, संभाजी सोपान भोसले, संदिप काळूराम दरेकर, महिला बचत गट, WOTR शेड फाउंडेशन पुढे आले आहे.
या वेळी उपस्थित मध्ये सरपंच आशा दरेकर, उपसरपंच कमल दरेकर, प्रमिला दरेकर, सुनीता दरेकर, मंदाकिनी दरेकर, नितिशा दरेकर, ज्योती काशीकर, अश्विनी कड, शारदा दरेकर, प्रणिता जवळकर, वृषाली दरेकर, माया दरेकर, विक्रम दरेकर, संभाजी भोसले, सोमनाथ दरेकर, राहूल दरेकर, प्रभाकर दरेकर, पांडुरंग दरेकर,अतुल विश्र्वासे, तुकाराम साळुंके, शंकर दरेकर, बाळासाहेब चकोर, प्रताप दरेकर, ज्ञानोबा गव्हाले, शरद शेलार, विशाल दरेकर, तसेच पालक आदी मान्यवर उपस्थित होते,