आळंदी जनहित फाऊंडेशन सह आळंदी येथील विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी यांचे वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पुण्यतिथी निमित्त महात्मा गांधी यांचे रक्षा विसर्जन स्थळ स्मारक येथे महात्मा गांधी यांचे स्मारक प्रतिमेस माजी विरोधी पक्ष नेते नगरसेवक डी. डी.भोसले पाटील यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी संयोजक आळंदी जनहित फाऊंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, सामाजिक कार्यकर्ते हमीद शेख, सुभाष महाराज शिंदे, काँग्रेसचे मा. शहराध्यक्ष नंदकुमार वडगावकर, संजय चव्हाण, संतोष वीरकर आदी मान्यवर उपस्थित होते. हुतात्मा दिनी शहिदांचे कार्याचे स्मरण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी इंद्रायणी नदी घाटा वरील महात्मा गांधी रक्षा विसर्जन स्थळ स्मारक येथे सर्वांनी अभिवादन आणि पुष्पांजली माल्यार्पण करीत अभिवादन केले. हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ खेड तालुका, आळंदी जनहित फाऊंडेशन, श्री आळंदी धाम सेवा समिती चे वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.