महाराणी येसूबाई साहेब या ग्रंथाने ग्रीनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये उमटवला ठसा

Bharari News
0
प्रतिनिधी वैभव पवार
         पुणे जिल्ह्यातच नव्हे तर आशिया खंडात प्रसिद्ध असणाऱ्या पिंपरी-चिंचवड औद्योगिक नागरितील शिवाजीराव शिर्के यांनी महाराणी येसूबाई साहेब ग्रंथ लिहून 05नोव्हेंबर 2023 रोजी प्रकाशित केला. या ऐतिहासिक पुस्तकाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. यामुळेच महाराणी येसूबाई साहेब या ऐतिहासिक ग्रंथास इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे सुवर्ण पदक व पारितोषिक सन्मान पत्र प्राप्त झाले आहे.
            शिवाजीराव शिर्के यांनी विविध ऐतिहासिक ग्रंथाचा अभ्यास करून धर्मवीर छत्रपती संभाजीमहाराज भोसले यांच्या धर्मपत्नी. महाराणी येसूबाई साहेब यांच्या संघर्षमय जीवनावर हा ग्रंथ लिहिला आहे. शोध आदर्श व्यक्तिमत्वचा, कुटुंब लहान-  सुख महान, पराचा कावळा,पसरणी गावच्या कालभैरवनाथाचे महात्म्य, पसरणी गावची गौरवगाथा, गरुड भरारी -सातारच्या उत्तुंग व्यक्तीमत्वाची, ही पुस्तके लिहिली आहेत. पुरस्कार ही पैशाची किमया सारी या लघु नाटिका लिहिल्या त्यांनी आहेत. शिवाजीराव शिर्के हे 
कृष्णा काठ ते पावनाकाठ हे आत्मचरित्र तसेच राजेशिर्के घराण्याचा  कुलवृत्तांत, शिरकाण ही ऐतिहासिक पुस्तके देखील त्यांनी लिहिली आहेत. आणि आता महाराणी येसूबाई साहेब यांच्या जीवनावरील ग्रंथाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे.
           संस्थेने सुवर्ण पदक, सन्मान पत्र देऊन यांचा गौरव केला आहे. महारणी येसूबाई साहेब या ग्रंथाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी नोंद करून गौरव केल्याने पुणे, पिंपरी, चिंचवड, औद्योगिक नगरितील कामगार, कवि, साहित्यिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते,  विविध मंडळ यांच्याकडून शिवाजीराव शिर्के यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.सोबत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार . उदयनराजे भोसले, आमदार पै. महेश लांडगे यांच्या कडून विशेष अभिनंदन व कौतुक करण्यात आहे. शिवाजीराव शिर्के हे सा. पावनेचा प्रवाह याचे संपादक देखील आहेत.यांचे आमच्या भरारी न्युज चॅनेल तर्फे अभिनंदन व शुभेच्छा.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!