सुनील भंडारे पाटील
वाघोली (तालुका हवेली ) येथे माणुसकीला व नात्याला काळीमा फासणारी घटना घडली असून लोणीकंद पोलिस ठाण्यात हद्दीत वाघोली येथे जन्मदात्या मुलीवर वडिलांनी धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामध्ये मुलीचा मृत्यू झाला आहे,
याबाबत लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अक्षदा दुपारगुडे वय 15 वर्षे (इ,दहावी मध्ये शिकत होती) पत्ता सरकारी हॉस्पिटल वाघोली च्या पाठीमागे,असे मृत्यू पावलेल्या मुलीचे नाव आहे,या घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले जन्मदात्या बापाने अक्षरशः स्वतःच्या मुलीवर कुऱ्हाडीने डोक्यावर, हात-पायावर वार करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये मुलगी गंभीर जखमी झाल्यानंतर तिला जखमी अवस्थेत रुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. परंतु उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे, यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या गुन्ह्याबाबत आरोपी वडील फकीरा दुपारगुडे याला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे, ही घटना आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली, याबाबत मुलीच्या मावशीने लोणीकंद पोलिसात तक्रार दाखल केली असून पुढील तपास लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस करत आहेत,