सुनील भंडारे पाटील
एकीकडे देशात राजकीय भांडण आणि गदारोळ होताना मतदारांची पंचाईत होते. अशा परिस्थतीमध्ये वक्त्यांची भुमिका महत्वाची आहे असे मत दिग्दर्शक संतोष संखड यांनी व्यक्त केले. शाई प्रतिष्ठानच्या वतीने बी जे एस महाविद्यालय वाघोली येथे आयोजित करण्यात आलेल्या खुल्या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते
शाई प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते यावर्षी प्रथमच वक्तृत्व स्पर्धा आयोजीत गेली होती. यात १२३ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.साहित्यकेसरी महाकरंडक प्रथम वर्षाचा मान यश पाटिल यांना मिळाला रोख रक्कम ११,००० रूपये सन्मान चिन्ह, फिरता करंडक मानाचा शेला देण्यात आला. तर या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोहन कवडे, द्वितीय पारितोषिक विवेक वारभुवन, तृतीय पारितोषिक तेजस पाटील यांना मिळाले.
यावेळी प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. प्रभाकर देसाई सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी विभाग, प्रकल्प अधिकारी सुरेश साळुंखे, मायभूमी फाउंडेशनचे सतीश शिंगणे, पत्रकार पोपट शंकर मांजरे,डॉ मनोज सूर्यवंशी, भाई अविनाश इंगळे, प्राचार्य डॉ संजय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा दोन फेर्यांत घेण्यात आली होती, पहिल्या फेरीतून २४ स्पर्धकांना दुसऱ्या फेरीत प्रवेश दिला गेला.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा डॉ. सहदेव चव्हाण, प्रा. स्वप्नील इंगोले, प्रा गणेश लोळगे, विशाल उशिरे, सूर्यनारायण यादव हे उपस्थीत होते. बक्षीस वितरण समारंभात सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, ज्येष्ठ कवी हनुमंत चांदगुडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पार्थ भेंडेकर व सुशील दोडके यांनी केले तर गौरव पुंडे, प्रमोद घोरपडे, ऐश्वर्या नेहे, योगेश हरणे, श्रेया वैद्य, नवनाथ पाटोळे, प्रवीण काजळे विश्वेश्वर बोडखे, विवेकानंद पाटील, विद्या अंभोरे, गजानन साबळे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी अनेक कवी, लेखक, वक्ते यांनी हजेरी लावली होती.