सुनील भंडारे पाटील
मुळ जागामालक आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यातील वादामुळे वाघोलीतील आयव्ही इस्टेटकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने काही लोकांनी एकत्र येत रात्रीत रस्त्याचे डांबरीकरण केले , या रस्त्याचे प्रकरण न्यायालयात असतानाही रस्ता दुरुस्त केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांच्यासह ९ जणांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जागेचा वाद न्यायालयात असतानाही दुरुस्ती करण्यात आल्याने जागामालकाने प्रथम संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती मात्र कारवाई होत नसल्याने न्यायालयात धाव घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी नितीन कुंजीर, सचिन माळी, अनिल दिलीप सातव, ज्ञानेश्वर पंढरीनाथ कटके, अस्लम अब्दुल्ला हाजी, राजेश अनिरुद्ध पाटील, विजय तांबे, सागर सुखदेव तांबे, सुचित विष्णू सातव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आठ सप्टेंबर ते नऊ सप्टेंबर २०२३ च्या मध्यरात्री आयव्ही इस्टेटकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाल्याने मूळ जागा मालकाचा विरोध न जुमानता काही लोकांनी एकत्र येत रस्ताची दुरुस्ती करण्यात आली होती.
सदर जागेबाबत मनाई हुकुम व न्यायायालयात वाद सुरु असतानाही दुरुस्ती करण्यात आल्याने व मूळ जागामालक भालचंद्र सातव यांच्यासोबत झालेल्या प्रकाराबाबत त्यांनी लोणीकंद पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अर्ज करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती मात्र लोणीकंद पोलिस ठाण्यात केवळ एनसी दाखल करण्यात आली होती.त्यामुळे सातव यांनी प्रथमवर्ग न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणी आता तरी लोणीकंद पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करत तपास करणार का ? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे