लोणीकंद मधील थेऊर चौक व आळंदी फाटा चौकाला वाहतूक कोंडीचे ग्रहण

Bharari News
0
हवेली प्रतिनिधी
              लोणीकंद (ता हवेली) थेऊर चौक व आळंदी फाटा येथे वाहतूक कोंडी हे समीकरण नित्याचे झाले आहे. बेशिस्त वाहने चालविणे, तसेच अतिक्रमणांमुळे अरुंद झालेले रस्ते व अवजड वाहनांमुळे चौकातील कोंडीत भर पडत आहे. याचा फटका विद्यार्थी, चाकरमान्यांना तसेच व्यावसायिकांनाही बसत असल्याचे चित्र दिसत आहे.पोलिस यंत्रणेच्या नियोजना अभावी प्रचंड वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले आहेत वाहतुक शाखेचे पोलीस व वॉर्डन सुध्दा या कोंडीने हतबल झाले असुन कोंडी सोडवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात परंतु चौकात दहा मिनिटे वॉर्डन गैरहजर असल्याने वाहतुक कोंडी होते .
             फुलगाव, कोरेगाव भिमा, सणसवाडी, रांजणगाव गणपती, कारेगाव आदी परिसरातील औद्योगिकरण, उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रहदारी खूप असल्याने वाहतूक कोंडी होते बऱ्याचवेळा रुग्णवाहिकाही अडकून पडत आहेत शिवाय स्कूलबसही कोंडीत सापडल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास विलंब होत असल्याचे पालक सांगतात. कित्येक वेळा आळंदी फाटा चौक परिसरातील स्थानिक तरुण वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न करतात  मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.सोलापूररोड व आळंदीकडून लोणीकंदकडे येणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे रोज होत असलेली
वाहतूककोंडी यासाठी सामाजिक कार्यकर्ते भारतीय किसान संघ व प्रबोधन केंद्राचे अध्यक्ष संस्थापक उत्तमराव भोंडवे यांनी  मा. जिल्हाधिकारी  व अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाला वाहतूक कोंडी तसेच अतिक्रमणाबाबत लेखी निवेदनाद्वारे तक्रार दिली आहे त्याची संबंधित प्रशासनाने दखल घेऊन अतिक्रमण काढून चौक मोठा करण्याचे आश्वासन दिले आहे परंतु कुठलीही कारवाई प्रशासनाने केली नाही ?
           पुण्याच्या पूर्व पट्ट्याला जोडणारा पुणे नगर रस्ता त्यामुळे  आळंदी फाटा चौकात वाहतूक कोंडी नित्याची होते आहे.सोलापूरकडे जाणारी वाहतूक ही थेऊर चौक मार्गे जाते, चौकात वाहतूक कोंडी झाल्यावर काही गाड्या विरुद्ध दिशेने बेशिस्तपणे हाकत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे प्रशासनाने ठोस पावले उचलली पाहिजे अशी स्थानिकांची मागणी आहे .
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!