बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलनात कलाविष्कार

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील 
          शिरूर येथील बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे बालाजी इंग्लिश मीडियम स्कूल(CBSC), बालाजी विश्व विद्यालय ( सेमी इंग्रजी) बालाजी विश्व प्री स्कूल ,बालाजी किड्स वर्ल्ड स्कूल या विद्यालयांचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले . शिरूर पंचक्रोशीत स्वतःचे वेगळे स्थान असणारी बालाजी ही एकमेव संस्था आहे .बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलात  वार्षिक स्नेहसंमेलन आनंदात आणि जल्लोषात पार पडले .विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध कार्यक्रमांचे विद्यालयांमध्ये आयोजन करण्यात आले होते.
               बालाजी शैक्षणिक संकुला मध्ये प्रथम दिवशी बालाजी इंग्लिश मीडियम स्कूल यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम पार पडला . भारतीय संस्कृतीचे जतन करणारा भारतीय संस्कृति सौरभम् व महाराष्ट्र संस्कृति वैभवम् या उत्कृष्ट थीम घेऊन दोन्ही दिवसाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन सदाशिव आण्णा पवार होते. कार्यक्रमासाठी बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या खजिनदार, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या माजी चेअरमन (कात्रज डेअरी), संचालिका महाराष्ट्र राज्य दूध महासंघ महानंद डेअरी (मुंबई) केशरताई पवार,
          संस्थापक सदस्य बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ, तसेच मा.सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती,आणि मा.व्हाईस चेअरमन घोडगंगा सहकारी साखर कारखाना चे  प्रकाश बापू पवार ,तसेच पहिल्या दिवशी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय किशोर राजे निंबाळकर  माजी अध्यक्ष महाराष्ट्र लोकसेवा साहेबराव शेळके निवृत्त कर्नल.बाळासाहेब बेंद्रे विशेष लेखा परिक्षक एम.एस.पुणे ,बबन पवार अध्यक्ष शिरूर त्रिदल सैनिक संघटना,रेखाताई कर्डिले सरपंच कर्डिलवाडी , शिल्पाताई गायकवाड सरपंच शिरूर ग्रामीण आदी मान्यवर   उपस्थित होते.. दुसऱ्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मा.श्री अक्षय भोरूडे(आय.एफ.एस),मा.सुरेश पाटील निवृत्त कर्नल आणि सोशल वर्कर,सौ.वैशाली गुंजाळ प्रेसिडेंट रोटरी क्लब,पुणे.
            अनेक गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य पालक शिक्षक संघाचे सदस्य आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दोन्ही दिवसांचे कार्यक्रम पार पडले.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती , नटराज मूर्ती व श्री राम यांच्या प्रतिमा  पूजनाने तसेच,दीप प्रज्वलन करून झाली. विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीताने पाहुण्यांचे व उपस्थितांचे स्वागत केले.
सर्व मान्यवरांचे सत्कार शाल,श्रीफळ, पुष्प गुच्छ,व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. वर्षभरात विविध उपक्रम राबविले जातात. क्रीडा, गायन, वादन, नृत्य शालाबाह्य व शालान्तर्गत स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
          नेहमी उत्साहाने काम करणारे समन्वयक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा देखील सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर गणेश वंदनेने विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रमात गायन वादन, भारूड, जोगवा, किर्तन, देशभक्तीपर गीते,शिवमहिमा, रामायणातील प्रसंग आदी कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला होता.
हे सर्व पाहून सन्मानीय पाहुण्यांनी  सदाशिव आण्णा पवार यांच्या संस्थेच्या कार्याचे विशेष कौतुक केले.पोपटराव गावडे यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. बालाजी विश्व विद्यालयाचे प्राचार्य विनायक म्हसवडे आणि बालाजी इंग्लिश मिडीयम स्कूल चे प्राचार्य गणेश मित्पल्लिवार यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. अक्षय भोरूडे यांनी आपल्या भाषणात  स्पर्धा परीक्षा तयारी, मोबाईल चा कमी वापर तसेच त्यांनी  स्व-ची ओळख करून घ्या असे प्रतिपादन केले.सर्व मान्यवरांनी  विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करून विद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे.यासाठी मार्गदर्शन केले दोन्ही विद्यालयाचे प्राचार्य  यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील समन्वयक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. उपप्राचार्य स्वाती चत्तर आणि प्रणिता शेळके यांनी कार्यक्रमाचे सूनियोजन केले ललिता पोंदे यांनी सूत्र संचालन करून कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन केले  .वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!