सुनील भंडारे पाटील
लोणीकंद (तालुका हवेली ) लोणीकंद पोलीस ठाण्यात हद्दीत गुन्हे शाखा युनिट-६ चे पथक प्रतिबंधात्मक पायी पेट्रोलिंग करित असताना गांजा विक्री करणा-या गुन्हेगारांकडून एकूण १,२९,५२०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांना जेरबद केले
पोलीसांनी दिलेल्या सविस्तर माहीतीनुसार दि.३१/०१/२०२४ रोजी वाघोलीत गुन्हे शाखा युनिट-६ चे पथक प्रतिबंधात्मक पायी पेट्रोलिंग करताना आव्हाळवाडी फाटा येथील बाजार तळ भिंती जवळ मोटार सायकल घेऊन दोन इसम संशयीत रित्या हातामध्ये बॅग घेऊन उभे होते त्यांनी पोलीस पथकास बघुन ते घाईने दुचाकी गाडी चालू करून निघुन जाण्याचा प्रयत्न करु लागले पोलीसांना संशय आल्याने त्यांना थांबवून विचारला केली ते उडवा उडवीचे उत्तर देवु लागले व पळुन जात असताना युनिट कडील पोलीस पथक व लोणीकंद पो.स्टे कडील पोलीस स्टाफच्या मदतीने त्यांना मोठ्या शिताफिने पकडले व पोलीस पथकाने त्यांची कसून चौकशी केली असता त्यांचे नाव निखिल यशवंत नवले वय २४ वर्षे, रा. रेल्वे स्टेशन विसापुर ता. श्रींगोदा जि. अहमदनगर व आदित्य विलास देशमुख वय १९ वर्षे रा, हांडेबाई चौक, विसापुर ता.श्रींगोदा जि. अहमदनगर असे सांगितले त्यांचे ताब्यातील बॅगेची झडती घेतली असता बॅगमध्ये गांजा अंमली पदार्थ मिळुन आल्याने, निखिल यशवंत नवले व आदित्य विलास देशमुख यांचे विरुद्ध लोणीकंद पो.स्टे.गु.र.नं.८१/२०२४ एन.डी.पी.एस.अॅक्ट कलम ८ (क), २०(ब)(ii)(ब) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करुन ०४ किलो २२६ ग्रॅम गांजा, गुन्हा करते वेळी वापरलेली मोटार सायकल व ०३ मोबाईल फोन असा एकुण १,२९,५२०/- रु.किं.चा. मुद्देमाल हस्तगत करून अटक केली .
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर रितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, (अतिरिक्त कार्यभार) व मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, रामनाथ पोकळे, मा. पोलीस उपआयुक्त,गुन्हे, अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २, सतिश गोवेकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनिट ६ गुन्हे शाखा, उल्हास कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद पो.स्टे.चे विश्वजीत काइंगडे, सहा. पो. निरी. सोमनाथ पडसळकर, तसेच गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार रमेश मेमाणे, विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, प्रतिक लाहीगुडे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, नितीन धाडगे, महेंद्र कडु, ज्योती काळे, सुहास तांबेकर, सागर जगताप, अमोल ढोणे यांनी केली.