नुकतीच भाजपा प्रदेश कार्यालय मुंबई येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र राज्य प्रदेश लिगल सेलचे अध्यक्ष ॲड. उदयजी डबले, प्रदेश प्रभारी ॲड. धर्मेद्रजी खांडरे, महाप्रदेश संघटनमंत्री रवीजी अनासपुरे यांच्या मार्गदर्शनाने ॲड संजय दत्ताञय सावंत (पाटील) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष लिगल सेल पदी निवड केली.
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालय मुंबई येथे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पक्षातील अनेक जिल्ह्यातील नेत्यांचे पक्षप्रवेश झाले तसेच पदाधिकारी बैठक घेण्यात आली यामध्ये अँड. संजय दत्तात्रय सावंत (पाटील) यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश लिगल सेल उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
सावंत (पाटील) हे गेली 5 वर्षापासुन भारतीय जनता पार्टी मध्ये पुणे जिल्हा कायदा आघाडीचे जिल्हाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश निमंञित सदस्य, स्वच्छ भारत अभियान मध्ये महाराष्ट्र प्रदेश संघटन सरचिटणीस, शिरुर लोकसभा संयोजक समिती सभासद, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक मर्यादीत वर कायदेशीर सल्लागार या सर्व जबाबदाऱ्यावर सध्या कार्यरत आहेत तसेच गेली 16 ते 17 वर्षापासुन सातत्याने वेगवेगळ्या सामाजिक संघटना सोबत महाराष्ट्राभर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय असे कार्य करत आले आहे, वकीली व्यवसाय करत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य त्यांच्या माध्यमातून होत आलेले आहे. अशाप्रकारे पार्टी मध्ये सावंत (पाटील) यांनी आपली दिलेली जबाबदारी खुप चांगल्या पध्दतीने पार पाडत आहेत म्हणूनच प्रदेश कमिटी मध्ये भारतीय जनता पाटीने त्यांचा विचार केला गेला आहे.
संजय सावंत (पाटील) यांची महाराष्ट्र राज्य भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेल उपाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर ॲड सावंत पाटील यांनी अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ,अध्यक्ष ॲड डबले सर, ॲड खांडरे सर यांना विश्वास दिला की अखंड महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बांधनी करत असताना महाराष्ट्र राज्यभर प्रवास करुन केंद्रसरकारच्या व राज्यसरकारच्या संपुर्ण योजना सर्वसामान्य जनतेपर्यत पोहचण्याचा प्रयत्न करणार, जनजागृती करणार, तसेच पार्टीसाठी संघटनात्मक बांधणी मोठ्या प्रमाणात करणार अशी खाञी दिली.