पुणे जिल्हा प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेब यांच्या सूचने वरून व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर जी बावनकुळे साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार हर्षवर्धन जी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शना खाली व पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे यांच्या सूचने नुसार इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे गाव चलो अभियान इंदापूर तालुक्यात सुरू झालेलं असुन या बद्दलची माहिती भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस अकाशजी कांबळे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले आहे.
गाव चलो अभियान निमित्ताने दिनांक १९ रोजी बावडा ता. इंदापूर जिल्हा पुणे येथे भाजपा पुणे जिल्ह्याचे सरचिटणीस प्रवासी कार्यकर्ते श्री आकाशजी कांबळे यांच्या सोबत प्रवास सुरू झाला असुन या प्रवासामध्ये बुथ समितीची बैठक घेतली गेली त्या मध्ये नमो ,सरल ॲप डाऊनलोड करण्याविषयी माहिती दिली गेली तसेच
बुथ समितीचे व्हाट्सअप ग्रुप ,जनता व्हाट्सअप ग्रुप तयार केले गेले आहेत.
तसेच मोदी सरकारच्या योजनांचे पत्रक वाटप केले तसेच गाव चलो अभियान निमित्ताने धार्मिक स्थळांना प्रभावशाली व्यक्तींच्या गाठीभेटी घेतल्या तसेच मुख्य जाग्यावर दिवार लेखन केले. व लाभार्थी अभियाना अंतर्गत वस्ती भेट करण्यात आली.
यावेळी गाव चलो अभियान दौर्या मध्ये इंदापूर तालुका संयोजक बाळासाहेब पानसरे, सचिन सावंत, उदयसिंह पाटील, मयूर पाटील ,किरण पाटील विस्तारक राजकुमार जठार, अजय पाटील, स्वप्नील घोगरे, अमोल घोगरे, रणजीत चव्हाण, ब्रह्मदेव कदम या पदाधिकार्यांसह बुथ प्रमुख व गावचे भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी यांना भेटी देऊन त्यांच्या शी चर्चा संपल्यानंतर दुपारचे जेवण इंदापूर तालुका भाजपाचे सरचिटणीस सचिन सावंत यांच्या सोबत त्यांचे घरी केले व अशा पद्धतीने गाव चलो अभियान कार्यक्रम संपन्न झाला असे भाजपा जिल्हा सरचिटणीस अकाशजी कांबळे यांनी भरारी न्युज ला बोलताना सांगितले आहे.