शिवजयंती उत्सवा निमित्त शिरवळ मध्ये शिवकालीन शस्त्रास्त्रांचे ऐतिहासिक प्रदर्शन- प्रसाद बनकर यांची माहिती

Bharari News
0
 पुणे जिल्हा प्रतिनिधी
            शिवजयंती उत्सवा निमित्त जय तुळजा भवानी सांस्कृतीक हॉल शिरवळ येथे दिनांक १८/०२/२०२३ रोजी शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन चा शुभारंभ करण्यात आला. हे प्रदर्शन दोन दिवस चालनार आहे. 
श्री. प्रसाद कृष्णराज बनकर
रविवार पेठ वाई जि सातारा 
शिवकालीन शस्त्रास्त्र संग्राहक व इतिहास अभ्यासक तसेच
भारत इतिहास संशोधक मंडळ आजीव सदस्य यांच्या माध्यमातुन
तसेच ऐशियन पेंन्टस कामगार संघटना यांच्या वतीने या प्रदर्शना चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बोलताना श्री प्रसाद बनकर यांनी या विषयी प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या शिव भक्तांना या शस्त्रास्त्रांची माहीती दिली ती पुढील प्रमाणे आहे.
प्रसाद बनकर हे गेली २२ वर्षा पासुन शिवकालीन शस्त्रास्त्रे साठवण्याचा छंद जोपासत आहे. जवळपास महाराष्ट्रामध्ये १९० पेक्षा जास्त शिवकालीन शस्त्रा स्त्रांची प्रदर्शने देखील त्यांनी केलेली आहेत. या प्रदर्शना च्या माध्यमातून आत्ताच्या नवीन पिढी समोर आपल्या छत्रपतींनी व विविध सरदारांनी तसेच पूर्वजांनी मर्द मराठा मावळ्यांनी केलेला ज्वाजल्य व गौरवशाली इतिहास मांडण्याचा सलग गेले १९ वर्ष प्रयत्न चालू आहे. असे त्यांनी सांगितले.

त्यांच्या शिवकालीन शस्त्रास्त्रांच्या संग्रहामध्ये तलवार , भाले , बरचे , वाघनख , बिचवा , दांडपट्टे , मराठा धोप तलवार , चिलानम , ढाल व ढाली चे विविध प्रकार , धनुष्य-बाण , गुर्ज , संगिनी , ब्रिटिश कालीन तलवार , ब्रिटिश कालीन बंदुका , बारूद दान , चिलखत -जिरे टोप , खंजीर , जांभिया , कर्द , ब्रिटिश कालीन चाकू व चाकूंचे प्रकार , मुघल समशेर , मराठा समशेर व समशेर चे प्रकार , मराठा खांडा तलवार , कट्यार व कट्यारी चे प्रकार , चंद्राकर तलवारी , मुघल तलवारी , तोफ गोळे - दगडी लोखंडी , पोलादी या प्रकारात , सर्पिनी तलवार , रजपुत तलवार , गोलिया तलवार , निमछा तलवार , पट्टा तलवार इत्यादी इ. संग्रहामध्ये शस्त्रास्त्रे आहेत. यामधील काही शस्त्रास्त्रे ही १४ व्या आणि १५ शतकातील देखील आहेत.असे या वेळी बोलताना प्रसाद बनकर यांनी सांगितले. तसेच विविध देवी देवतांच्या तांबे , पितळ , पंचधातू , अष्टधातू पासून बनविलेल्या मुर्त्या देखील त्यांच्या संग्रहामध्ये आहेत.

तसेच गेली ४०० ते ५०० वर्षे जुने असलेले विविध दिवे व दिव्यांचे प्रकार याचा देखील मोठा संग्रह आहे, असे सांगण्यात आले
जवळपास १२ हजारापेक्षा जास्त जुनी नाणी देखील त्यांच्या संग्रहामध्ये आहेत. त्यामध्ये मेन प्रोफाइल म्हणून "छत्रपती शिवाजी महाराजांचे चलन - शिवराई" यावर त्यांनी विशेष भर देऊन ती नाणी जमवीत आहे व त्याबद्दल बराच अभ्यास देखील केलेला आहे. शिवराई चे बरेच प्रकार देखील त्यांच्या संग्रहामध्ये आहेत. त्याचबरोबर मोडी लिपी चा अभ्यास देखील केलेला आहे. असे या वेळी बोलताना त्यांनी सांगितले या प्रदर्शनाला विशेष असे सहकार्य लाभले ते ऐशियन कामगार संघटनेचे लाभले आहे व हे प्रदर्शन दरवर्षी प्रत्येक शिव जयंती उत्सव निमित्त या पुढे भरवण्यात येणार आहे.
 असे या वेळी बोलताना श्री. प्रसाद बनकर यांनी भरारी न्युजला मुलाखत देताना सांगितले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!