हवेली तालुक्यातील मांजरी येथील एका शाळेत फर्स्ट स्टॅंडर्ड मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीला 35 हजार रुपये फी थकली म्हणून उद्यापासून शाळेत येऊ नको म्हणून शाळेकडून मुलीला दिली तंबी गेली असल्याची घटना आज उघडकीस आली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी पहिलीच्या इंग्लिश मीडियम शाळेत शिकत असून ही शाळा मांजरी हद्दीत आहे .
शाळेत प्रवेश घेताना एक लाख 25 हजार शाळेची फी व 35 हजार रुपये बुक व युनिफॉर्म साठी देण्याचे शाळेने सांगितले आत्तापर्यंत पालकाने 90 हजार रुपये शाळेची फी व 35 हजार रुपये बुक व युनिफॉर्मचे पैसे भरले असताना सुद्धा केवळ 35 हजार रुपये राहीले म्हणून मुलीच्या वडिलांनी शाळेत जाऊन चेक देतो असे सांगून सुद्धा मुलीला उद्यापासून शाळेत येऊ नको असे सांगितले. त्यामुळे मुलगी व तिचे पालक प्रचंड मानसिक दबावाखाली आले असून मुलीला अशी वागणूक मिळेल याची पुसटशी कल्पना सुद्धा या पालकांना नव्हती.
खरंच शिक्षण संस्था या मुलांच्या शिक्षणासाठी की शिक्षणाचा बाजार करण्यासाठी अशी चर्चा हवेली तालुक्यातील नागरिकांमध्ये असून या गोष्टीचा नागरिकांनी तीव्र निषेध केला आहे. व संबंधित शाळेवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी अनेक नागरिकांनी केली आहे.
शिक्षणाचा जर असा बाजार झाला तर सावित्रींच्या या लेकींना खरोखरच शिक्षणापासून वंचित राहण्याशिवाय पर्याय नाही.अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे .
एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुलींना मोफत शिक्षणाची घोषणा करत असून दुसरीकडे शिक्षण व्यवस्थेमधील तस्कर व सध्याचे शिक्षण सम्राट मात्र शाळेची फी भरली नाही म्हणून मुलीला शाळेत प्रवेश नाकारत आहेत.यामुळे पुण्या सारख्या शिक्षणाच्या माहेर घरात मुलींना मात्र शिक्षणाचा सासुरवास सुरू झालेला पाहण्यास मिळत आहे.
याबाबत गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही .