आळंदीत बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

Bharari News
0
आळंदी प्रतिनिधी
               हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ खेड तालुका यांचे वतीने आळंदीत आचार्य दर्पणकार, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे जयंती त्यांचे प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून तसेच उपस्थित मान्यवर यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादनाने जयंती साजरी करण्यात आली.
              यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर, पत्रकार भागवत काटकर, माऊलींचे मानकरी ज्ञानेश्वर कुऱ्हाडे पाटील, माऊली घुंडरे पाटील, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कवळासे आदी उपस्थित होते. आद्य पत्रकार, दर्पणकार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे जयंती निमित्त त्यांचे कार्याचे स्मरण करीत त्यांचे मार्गदर्शक विचार आचरणात आण्यास पत्रकार सृष्टीचा निश्चित विकास होईल असे यावेळी पत्रकार अर्जुन मेदनकर यांनी सांगितले. या वेळी उपस्थित सर्वांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली अर्पण करीत अभिवादन केले. हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ खेड तालुका यांचे वतीने जयंती साजरी करण्यात आली. यासाठी आळंदी इंटरसिटी सर्व्हिसेस यांनी विशेष सहकार्य केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!