निपाणी प्रतिनिधी
निपाणीतील श्री विरुपाक्षलिंग समाधी मठ गोशाळेमधील गोमतेसाठी दोन ट्रक चारा समाधी मठ गो शाळेला पुरवठा करण्यात आला.भारतीय संस्कृतीत गायीला पवित्र मानले जाते गाईचा अनेक मार्गाने मानवी जीवनाला उपयोग होतो म्हणून गोमाता म्हणून संबोधले जाते. पण आज हिंदू त्यापासून दूर होत चालला आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात गाय पुढच्या पिढीला चित्रात दाखवावी लागेल. गायीचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे. आयुर्वेदात गायीला महत्वाचे स्थान आहे. जर घरी गाय असेल तर त्यांना कोणताच त्रास होणार नाही. घरातील वातावरण सात्विक राहते. घरोघरी गायी सांभाळल्या पाहिजेत. त्यासाठी जागृती होणेदेखील तितकेच महत्वाचे आहे. गायीची सेवा करणे सर्वश्रेष्ठ आणी पवित्र कार्य आहे, असे प्रतिपादन प.पू . प्राणलिंग स्वामीजी यांनी केले.
यावेळी गोरक्षण सेवा समीती चे प्रमुख सागर श्रीखंडे म्हणाले, गोरक्षण बरोबर गोसंवर्धन ही काळाची गरज आहे यावर्षी दुष्काळ परिस्थिती जाणवत असल्यामुळे जनावरांना चारा मिळावा यासाठी हालसिद्धनाथ साखर कारखाना येथील फडतरी बांधव यांचा कडून दोन ट्रक चारा गोशाळेसाठी गोळा करून देण्यात आला. यावेळी समाधी मठ गोशाळे मध्ये राष्ट्रीय महामार्गावर बेकायदेशीर जनीवर वाहतूक प्रकरणी जनावरांची जी मुक्तता करण्यात आली होती तसेच कत्तलखाना मधून सुटका केलेल्या गाईनच्या प.पू.प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गदर्शना खाली सांभाळ केला जातो,
यावेळी शासनाने गोशाळेकडे लक्ष देण्याची गरज आहे. गोशाळेला विविध अडचणींना सामोरे जावे लागते. येणाऱ्या काळात आमच्या समविचारी संघटना कडून आणखीन चारा गोळा करून देऊ, असे सांगितले. गोशाळेसाठी कोणाला कोणतेही सहकार्य करायचे असेल त्यांनी गोरक्षण सेवा समीती किंवा प.पू . प्राणलिंग स्वामीजी समाधीमठ निपाणी येथे संपर्क साधावा, असे आव्हान यावेळी सागर श्रीखंडे यांनी केले.
हिंदू धर्म रक्षक अभियान प्रमुख आकाश स्वामी यांनी सांगितले की गोमतेच्या सणाच्या वेळी शेकडो हिंदूंनी विविध समाजमाध्यमांद्वारे शुभेच्छा देतात मात्र गोरक्षण, गोसंवर्धन करण्याच्या बाबतीत कोणतीच कृतीत दिसून येत नाही. ही हिंदूची मोठी शोकांतिका आहे. गोमातेसाठी फक्त समाजमाध्यमांवर प्रेम न दाखवता कृतीतून गोसंवर्धनासाठी प्रत्येकाने कार्य करायला हवे. तरच गोमातेचे रक्षण होईल असे मत व्यक्त केले
यावेळी मावळा ग्रुपचे विनायक खवरे म्हणाले की तरुणांनी गोमतेच्या सेवेला प्रधान्य देऊन ऊस गोळा केला, ही अभिमानस्पद गोष्ट आहे. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे चाऱ्याची टंचाई होणार आहे. पण असे तरुण जर समाजहितासाठी काम करणारे असतील तर आपण कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो. त्यांचा आदर्श इतर तरुणांनी घेऊन चाऱ्याचे आलेल संकट दूर करावे असे आवाहन केले.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नवनाथ खवरे,, आकाश स्वामी, विनायक खवरे,निथिन हनिमनाळे ,अवदुत खवरे, स्वप्नील खवरे, आकाश शेळके, आदित्य शेळके सागर श्रीखंडे, सहा कार्यकर्ते परिश्रम घेतले यावेळी गोरक्षण सेवा समीती निपाणी , हेल्प लाईन , 'मी हिंदू धर्म रक्षक अभियान' आणी मावळा ग्रुप मधील कार्यकर्ते उपस्तित होते यावेळी गोळा केलेल्या चाऱ्याची वाहतूक करण्यासाठी यमगर्नी येथील प्रसिध्द उधोजक अण्णासाहेब कोरे यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिला तसेच समाधी मठ गोशाळे साठी जेव्हा जेव्हा चाऱ्या आणण्यासाठी वाहनांची आवशकता लागेल तेव्हा तेव्हा आपल्याकडून विनामूल्य ट्रक मिळेल अशी ग्वाही दिल.तरुणांनी केलेल्या या उपक्रमाचे निपाणी परिसरातून कौतुक होत आहे,