पुणे जिल्हा प्रतिनिधी
अजित दादा पवार व आमदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या राष्ट्रवादी पार्टीला इंदापूर तालुक्यात खिंडार शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश.इंदापुर तालुक्यातील खोरोची,चाकाटी, रेडा, निरवांगी अशा अनेक गावातील कार्यकर्त्यांचा सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत दिनांक 28 /2/ 2024 रोजी प्रवेश झाला आहे.
पुणे जिल्हा संपर्कप्रमुख अमोल मुळे यांनी पंचवीस चार चाकी गाड्यांचा ताफा घेऊन हा प्रवेश घडवलेला आहे तसेच अमोल मुळे व सागर मिसाळ यांनी इंदापूर तालुक्यामध्ये शरद पवार गटात प्रवेशाचा सपाटा लावलेला आहे रेडा गावचे माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष काशिनाथ देवकर पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केलेला आहे त्यामुळे इंदापूर तालुक्यात शरद पवार गटाची ताकद वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.