सुनिल भंडारे पाटील
कोरेगाव भिमा (ता.शिरूर) दि.१९ फेब्रुवारी २०२४ ठीक ०८:३० फ्रेंड्स एजुकेशन इन्स्टीट्युट कोरेगाव भिमा संस्थेचे सचिव दिलीपराव वामनराव भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील मुलामुलींचे शिवचरित्रावर भाषणे झाली. मुलांच्या भाषणानंतर शाळेचे शिक्षक . शंकर बोरकर सरांनी छत्रपती शिवरायांचा चरित्राचा वैज्ञानिक दृष्टीकोनातुन इतिहास उलगडविला तर शाळेचे मुख्याध्यापक मदन हराळ पाटील यांनी शिवरायांचा कष्टकरी मावळ्यांचा प्रामाणिकपणा यावर सखोल इतिहास सांगितला.
यानंतर संस्थेचे सचिव दिलीपराव वामनराव भोसले साहेब यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले कि, शिवजयंतीतून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन आपले आयुष्य यशस्वी व गुणसंपन्न, चरित्र्यसंपन्न बनवले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला जो संघर्ष आला तेवढा संघर्ष तर तुमच्या वाट्याला आला नाही आणि जरी आला तरी संघर्षला तोंड देण्याची तयारी ठेवा. जेवढा तुमचा संघर्ष मोठा होईल तेवढाच तुमचा विजय निश्चित होईल.
ढोल-ताशांचा निनाद, भगव्या पताका, जय जिजाऊ जय शिवराय.... जय जय भवानी ....जय जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय.... घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक मदन हराळ पाटील यांनी पाहुण्यांचे आभार मानले. शाळेच्या उपमुख्याध्यापिका नायर अजिताकुमारी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर वर्ग व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिती बिचारे यांनी केले.