सुनील भंडारे पाटील
बुधवार दि २१ रोजीलोणीकंद तालुुका हवेली गावात मोठया प्रमाणात खाण व स्टोन क्रेशरमुळे होणारे हवेत होणारे प्रचंड प्रमाणात धूळीचे कण त्यामुळे प्रदूषण भयंकर वाढत आहे खाण क्रेशरवाले शासनाने दिलेल्या नियम व अटींची कसल्याही प्रकारचे नियमांचे पालन होत नसल्याने लोणीकंद ग्रामस्थांनी रस्ता खोदून वाहतूक बंद केली आहे
रस्त्यावर उडणाऱ्या प्रचंड धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे विशेष म्हणजे लहान मुले व महिला यांना हृदयविकार व फुफ्फुसाचे विकार, दमा, डोळ्यांचे आजार, त्वचेचे आजार यांना सामोरे जावे लागत आहे. अशा तक्रारी ग्रामस्थांच्या आहेत, गेल्या वीस ते पंचवीस वर्षे चाललेले या खडी क्रशरमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेक वर्ष असलेला हा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला, त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे, खडी क्रशरने भरलेले डंपर अचानक रस्त्यावर आल्याने तसेच पुणे नगर महामार्गावर आल्याने अनेक लहान-मोठे अपघात घडलेले आहेत,
त्याचप्रमाणे खडी क्रशर वाहतूक डंपरने महामार्गावर अनेक जीव घेतलेत, खडी वाहतूक करणारी सर्वच वाहने राजरोसपणे पुणे नगर महामार्गावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून राजरोसपणे धावत असल्याने या भागात रस्त्याच्या बाजूने देखील मातीचे खच तयार झाले आहेत, 24 तास ही माती उधळून लोकांच्या डोळ्यांमध्ये व तोंडामध्ये जात आहे, तसेच लोणीकंद मध्ये पुणे नगर महामार्गावर आलेले डंपर पुणे शहराच्या दिशेने जाताना या डंपर मधून धूळ सतत उधळल्याने प्रवासी देखील त्रस्त झाले आहेत, त्यामुळे अवैध चाललेली ही वाहतूक कायमस्वरूपी बंद करावी अशी मागणी नागरिक वारंवार करत आहेत,