प्रतिनिधी इंदापुर
ग्रामपंचायत म्हसोबाची वाडी चे सरपंच राजेंद्र राऊत व उपसरपंच रमेश चांदगुडे यांच्या कडून गावच्या विकासासाठी चंद्रकांत दादा पाटील यांचेकडे पुढील प्रमाणे कामांची मागणी करण्यात आली
( 1) महादेव मंदिर ते सत्यवान चांदगुडे घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 10 लक्ष रुपये.
(2)नवीन ग्रामपंचायत ऑफिस ते बबन भोसले घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 10 लक्ष .
(3)प्रमोद चांदगुडे घर ते हनुमंत राऊत घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 10 लक्ष रुपये.
(4)हनुमंत राऊत घर ते खंडोबा रास्ता काँक्रिटीकरण करणे10 लक्ष रुपये.
( 5) दादासो दत्तोबा चांदगुडे घर ते दत्तात्रय चांदगुडे घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 10 लक्ष रुपये.
(7)मुस्लिम समाज आदिवासी समाज गोंधळी समाज दफन भुमी साठी जागा उपलब्ध करणे 10 लक्ष रुपये. या मागण्या मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे करण्यात आल्या होत्या त्यापैकी तीन कामे मंजूर करण्यात आली.ती कामे पुढील प्रमाणे आहेत.
(1) महादेव मंदिर ते सत्यवान चांदगुडे घरापर्यंत काँक्रीट रस्ता करणे 5 लक्ष रुपये.
(2) प्रमोद दादा चांदगुडे घर ते हनुमंत राऊत घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता करणे 5 लक्ष रुपये (3) म्हसोबाची वाडी स्मशान भूमी दुरुस्ती व सुशोभीकरण करणे10 लक्ष रुपये.
निधी मंजुर करण्यात आला तो निधी अजित दादा पवार ,माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील,भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष वासुदेव नाना काळे,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब,तसेच भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस माननीय आकाश जी कांबळे साहेब यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर करण्यात आला त्या बद्द्दल समस्त ग्रामस्त म्हसोबाचीवाडी यांनी वरील सर्व मंत्री व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले.